PUNE CRIME BEAT( PCB ),Raj Rathod.
पुणे : १४ मार्च धुलीवंदन सणाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त परिमंडळ –५, डॉ. राजकुमार शिंदे यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. परिमंडळ पाच मधील पोलिसांनी गस्त वाढवत विविध हालचालींवर नजर ठेवली.
या अनुषंगाने, वानवडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग दरम्यान नवीन म्हाडा, समर्थ नगर येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. चांद अनिल सय्यद (वय ४८, रा. समर्थ नगर, हडपसर) याला दारू विक्री करताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून २००० फुगे आणि ३५ लिटरचे आठ कॅन असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा हातभट्टी दारू साठा जप्त करण्यात आला आहे, पोलीस पुढील तपास करत आहे.
0 Comments