पुणे: मुंढवा आणि हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार, पोलीस स्टेशनच्या बाहेरच गुटख्याची खुलेआम विक्री!

PUNE CRIME BEAT( PCB NEWS)
मुंढवा पोलीस स्टेशन, व हडपसर पोलीस स्टेशनच्या बाहेर सर्रासपणे गुटख्याची विक्री होत असल्याची बाब ही खरोखरच गंभीर आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही असे प्रकार घडत असतील तर यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रियता किंवा दुर्लक्ष असल्याचा संशय व्यक्त होतो.

पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ वानवडी येथे,६/१/२०२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मौल्यवान वस्तू हे मूळ मालकांना परत करण्यात आले, या कार्यक्रमात मा.पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार यांनी यापुढे अवैध धंदे ,हातभट्टी दारू, मटका, गांजा, जुगार, गुटखा यासारख्या अवैध धंदे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत श्री.अमितेश कुमार यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले, परंतु पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी  अवैध धंदे व अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कडक आदेश दिले असतानाही, 
मुंढवा पोलीस स्टेशन, व हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणच्या टपऱ्यांमध्ये व 
दूकानांमध्ये सरासपणे गुटखा विक्री होताना दिसते. त्यातून गंभीर म्हणजे अगदी पोलीस स्टेशनच्या बाहेरच गुटख्याची विक्री होत असेल तर खूप चिंताजनक आहे, जर अशा घटना घडत असतील तर याचा अर्थ आदेशांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आणि पोलिसांवर विश्वासाचा अभाव निर्माण होतो.

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडून पुणे शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे, असे बातम्या बऱ्याच वेळा सामान्य नागरिक हे प्रसारमाध्यमातून ऐकत असतात, परंतु पोलीस स्टेशनच्या अगदी बाहेर गुटख्याची विक्री होत असेल तर गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत का.?

अशा प्रकारामुळे सामान्य नागरिकांच्या  मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो,

मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्याकडून या संदर्भात कारवाई होणार का, हे पाहने बाकी आहे.

Post a Comment

0 Comments