PUNE CRIME BEAT( PCB NEWS )
पुणे अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडून दि. १५ जानेवारी २०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने येरवडा भागात छापा टाकून २३ लाख ३८ हजार ४०० रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम. डी) हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे,
या संदर्भात अहमद वाहिद खान, वय ४५ वर्षे, रा. सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर, येरवडा पुणे, याला ताब्यात घेऊन येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न अधिक तीव्र होत आहेत. गुन्हे शाखेची ही धडाकेबाज कारवाई समाजात अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.
अधिक माहितीसाठी,
दि.१५/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन इसम नामे अहमद वाहिद खान, वय ४५ वर्षे, रा. सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर, समता मित्र मंडळ जवळ, येरवडा पुणे याच्या ताब्यात एकुण २३,३८,४००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये २२,००,०००/- रू कि चे ११० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर एवज जप्त करून त्याचे विरुध्द येरवडा पोस्टे गु.र.नं.३७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, साहिल शेख, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, अझिम शेख, संदिप जाधव, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
0 Comments