PUNE CRIME BEAT( PCB NEWS )
अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान केलेल्या कारवाईत एक मोठे यश मिळवले आहे. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित भागात चरस आणि गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.
अरुण अशोक अरोरा वय-५० वर्षे, रा-प्रितम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज पुणे याच्या ताब्यात एकुण ४३लाख ८७हजार/- रू.कि.चा ऐवज त्यामध्ये २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चरस आणि गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सपोनि अनिकेत पोटे, अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक माहिती अशी की,
दि.१०/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, चे सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीवरुन इसम नामे अरुण अशोक अरोरा वय-५० वर्षे, रा-प्रितम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज पुणे याच्या ताब्यात एकुण ४३,८७,०००/- रू.कि.चा ऐवज त्यामध्ये २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोस्टे गु.र.नं.२७/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिकेत पोटे, अं.प.वि.प.१, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.
0 Comments