गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर.विधीसंघर्षीत बालकाकडुन १ पिस्तल व १ जिवंत काडतुस हस्तगत, तसेच दोन आरोपींकडून १ घरफोडीचा गुन्हा उघड.सिहंगड रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PUNE CRIME BEAT( PCB )
गुन्हे शाखा युनिट ३ मधील पोलीस अधिकारी व स्टाफ यांना माहिती मिळाली की, एक इसम पिस्तल घेऊन थांबला आहे, मिळालेल्या माहिती वरून गुन्हे शाखा युनिट ३ कडील पथक, कांबळे वस्ती गणेशनगर धायरी येथील मैदानामध्ये जाऊन सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले, अधिक चौकशी केली असता, विधीसंघर्षीत बालक असल्याचे समजले त्याला पिस्टल संदर्भात विचारले असता
पिस्टल हे त्याने त्याचा साथीदार याचेकडुन घेतले असल्याचे सांगितले आहे,

नमुद विधीसंघर्षीत बालकाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाणे, उत्तमनगर पोलीस ठाणे येथे दरोडा, दरोड्याचा प्रयत्न व अग्निशस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.



अधिक माहिती अशी की,
दि. ०६/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ मधील पोलीस अधिकारी व स्टाफ असे रेकॉडवरील गुन्हेगार चेकिंग व लॉज चेकीग व अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरिता गस्त करित असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की, विधीसंघर्षीत बालक हा कांबळे वस्ती, गणेशनगर धायरी येथील मैदानामध्ये थांबला असून त्याचेकडे पिस्टल आहे. मिळाले बातमीप्रमाणे जावून विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवून त्याचेकडुन कि.रु.४०,५००/- चे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तल व एक पितळी काडतुस मिळुन आले आहे.

नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे तपास करता सदरचे पिस्टल हे त्याने त्याचा साथीदार याचेकडुन घेतले असल्याचे सांगितले आहे. सदरचे पिस्टल हे त्यांनी मध्यप्रदेश येथून आणले असल्याचे सांगीतले आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाणे, उत्तमनगर पोलीस ठाणे येथे दरोडा, दरोड्याचा प्रयत्न व अग्निशस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी याचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे अग्निशस्त्राबाबत सिहंगड रोड पोलीस ठाणे गु.र.नं ७२३/२०२४ भारतीय शस्त्र अधि कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, युनीट ३, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.


तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५५६/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवा. संजीव कळंबे यांनी तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल हॅन्डसेट मनोज आनंदा गायकवाड, वय २२ वर्षे, रा. हरगुडे निवास, तिसरा मजला, सणसवाडी, पुणे हा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने व त्याचे साथीदार दिपक टिका विश्वकर्मा वय २० वर्षे, रा. साईपार्क सोसा. स. नं.१४, तुकाराम नगर, पुणे व राजु बहादुर रा. गाडीतळ, हडपसर, पुणे यांनी मिळून सदरची घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नामे मनोज आनंदा गायकवाड याचेकडून दाखल गुन्हयातील १०,०००/- रू चा एक मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे मनोज आनंदा गायकवाड व दिपक टिका विश्वकर्मा यांना पुढिल कारवाईकामी सिंहगड रोड पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच दाखल पाहिजे आरोपीचा शोध चालु आहे.

सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, श्री शैलेश बलकवडे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा श्री. निखिल पिंगळे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, श्री. रंगराव पवार, सहा. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, शरद वाकसे, गणेश सुतार, विनोद भंडलकर, सुजित पवार, संजीव कळंबे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, हरिश गायकवाड, इसाक पठाण व महिला पोलीस अंमलदार सोनम नेवसे यांनी कामगिरी केली.

Post a Comment

0 Comments