PUNE CRIME BEAT( PCB )
पुणे:अंमली पदार्थ विरोधी पथक-१ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, पथकासह पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की लोणी टोलनाका जवळ, एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे, मिळालेल्या बातमीप्रमाणे लोणी टोल नाक्याजवळ, रेड्डी हॉटेल शेजारी,पुणे सोलापुर रोड,या ठिकाणी सापळा रचुन इसम नामे साहिल विनायक जगताप वय २८ वर्षे,राहणार हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे यास ताब्यात घेऊन, त्याचे कडे असलेल्या सॅकबॅगचे झडतीमध्ये ३लाख १३हजार ८४० चा, १४ किलो १८२ गांजा विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,
दि.१३/१२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लोणीकाळभोर पो स्टे कडील सपोनि शिवशांत खोसे व पोलीस अंमलदार लोणीकाळभोर पो.स्टे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना प्राप्त झालेल्या माहितीचे अनुषंगाने लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी, सार्वजनिक रोडवर, पुणे सोलापुर रोड, पुणे या ठिकाणी सापळा रचुन इसम नामे साहिल विनायक जगताप वय २८ वर्षे, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे यास ताब्यात घेतले असता, त्याची व त्याचे ताब्यातील सॅकबॅगचे झडतीमध्ये कि.रु.३,१३,८४०/- चा १४ किलो १८२ गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे याठिकाणी एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १, श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सपोनि शशिकांत खोसे, तसेच पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बांगर, भगत यांनी केली आहे.
0 Comments