PUNE CRIME BEAT( PCB )
पुणे शहरातील लष्कर पोलीस स्टेशनने कारवाई करत एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. त्याच्यासोबत दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनी लष्कर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एका प्रवाशाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात त्वरीत तपास करत आरोपींना पकडले आहे. तडीपार असतानाही आरोपीने नियमांचे उल्लंघन करून पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवली होती. लष्कर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा आणखी कोणत्या गुन्ह्यामध्ये समावेश आहे का त्याचा तपास सुरू आहे.
अधिक माहिती अशी की
दि.१५/१२/२०२४ रोजी फिर्यादी हे खाजगी ट्रॅव्हल बसने लातुर येथुन पुण्यामध्ये आल्यानंतर ते म. गांधी बस स्टॉप जवळ उतरून पायी चालत बस स्टॉपकडे जात असताना त्यांना पोलीस रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार नामे छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आल्टे वय २३ वर्षे रा. बाबाजान चौक कॅम्प, पुणे व त्याचे साथीदार १) अमर विशाल खरात, वय १९ वर्षे रा. साईबाबा मंदिरा समारे कॅम्प, पुणे २) जयेश गणेश भिसे, वय १९ वर्षे रा. लक्ष्मीमाता मंदिरामागे काशेवाडी, पुणे यांनी मोटार सायकलवर ट्रिपल सीट येवुन फिर्यादीस रस्त्यामध्ये अडवुन मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला म्हणुन लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नंबर २८८/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद वरिल आरोपीतास शोध घेवुन दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.
दाखल गुन्हयात ताब्यात घेतलेल्या आरोपीतांकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींकडे खालीलप्रमाणे दाखल दोन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दोन मोटार सायकली व एक मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत, त्याबाबत लष्कर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावर पडताळणी करून पाहिले असता लष्कर पोलीस ठाणे गु. र. क्र. १२८/२०२४, भा. द. वि. कलम ३७९, तसेच इतर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावर पडताळणी केली असता, मुंढवा पोलीस ठाणे गु. र. क्र. ४२७/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०३ (२) असे इतर दोन गुन्हे केले असल्याचे तपासात उघडकिस आले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली अशी दोन वाहने एकुण ८०,०००/-रु. किं. ची आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.२ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, पुणे श्री. दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरिषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, म. पोलीस उप-निरिक्षक ज्योती कुटे यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, सागर हराळ, अल्का ब्राम्हणे, श्रीनिवास केंजळे, भगवान पाटोळे, रविंद्र कदम यांनी केली आहे.
0 Comments