(PCB NEWS) लिव्हाईस या नामांकित कंपनीचे बनावट कपडयांची विक्री होत असलेबाबतची माहिती लिव्हाईस कंपनीचे अधिकृत फिल्ड अधिकारी राकेश राम सावंत यांना मिळाली. त्यांनी सदरबाबतची माहिती पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, यांना कळवून कारवाईकरीता मदत मागितली असता पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. निखिल पिंगळे यांनी गुन्हे शाखा, युनिट ३ चे प्रभारी अधिकारी रंगराव पवार, यांना सदरची कारवाई करणेबाबत कळविले. त्याप्रमाणे त्यांनी युनिट ३ कडील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाले बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे बॅन्ड काईड क्लोदिंग, गुळवणी महाराज रोड, एरंडवणा, पुणे या दुकानात जावून छापा टाकला असता सदर दुकानात पॅन्ट, शर्ट व टि शर्टवर लिव्हाईस या कंपनीचे बनावट टॅग लावून विक्री होत असल्याचे समजून आले. सदर दुकानात ३,५४,०००/- रू चे लिव्हाईस कंपनीचे एकुण ११८ पॅन्ट, ३७,५००/- रू चे लिव्हाईस कंपनीचे एकुण १५ शर्ट, ४८,०००/- रू चे लिव्हाईस कंपनीचे एकुण २४ टि शर्ट असा एकुण ४,३९,०००/- रू.चा लिव्हाईस कंपनीचा बनावट माल मिळून आला. दुकान मालकाकडे केले तपासात त्यांनी सदरचा माल हा बैंगलोर, राज्य कर्नाटक व नेलोर, राज्य आंध्रप्रदेश येथून ऑनलाईन मागविला असल्याचे समजले आहे.
लिव्हाईस कंपनीचे अधिकृत फिल्ड अधिकारी राकेश राम सावंत यांनी बॅन्ड काईड क्लोदिंग, गुळवणी महाराज रोड, एरंडवणा, पुणे या दुकानाचे मालक यांचे विरूध्द तक्रार दिल्याने कॉपीराईट अॅक्ट खाली अलंकार पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १९९/२०२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रंगराव पवार, सहा. पोलीस निरीक्षक, मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, विनोद भंडलकर, राकेश टेकावडे यांनी केली.
0 Comments