(PCB NEWS ) अंमली पदार्थ विरोधी पथक, पुणे शहरात वेगवेगळे ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करीत असताना सोमवारी पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना माहिती मिळाली की, नर्हे येथील भुमकर चौकात काही जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा रचून, कृष्णा घोडनदीकर टॉवरजवळ तिघे जण आले असता, त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 19 लाख 45 हजारांचा ओजीकुश गांजा, MD, LSD जप्त करू सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : गांजा एम डी (MD), एल एस डी (LSD) असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ बाळगलेल्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले (Anti Narcotics Cell Pune). त्यांच्याकडून १९ लाख ४५ हजार रुपयांचा ओजीकुश गांजा, एम डी आणि एल एस डी अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. सराफ लाईन, मिश्रा निवास, बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर, घाटकोपर, मुंबई), पियुश शरद इंगळे (वय २२, रा. चिखली, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना माहिती मिळाली की, नर्हे येथील भुमकर चौकात काही जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा रचला. कृष्णा घोडनदीकर टॉवरजवळ तिघे जण घुटमळताना दिसले. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्या झडतीमध्ये १७ लाख ४१ हजार रुपयांचा २५१ ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा, १५ ग्रॅमचे एम ड व ६२ ग्रॅम चे एल एस डी असा अंमली पदार्थ व २ लाख ४ हजार रुपयांचा इतर ऐवज असा एकूण १९ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज मिळाला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास कदम,
सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के,
सचिन माळवे, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, नुतन वारे,
रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी केली आहे.
0 Comments