पुणे: घरफोडी करणाऱ्या आरोपीला युनिट ४ गुन्हे शाखा यांच्याकडून अटक. २ गुन्हे उघड, आरोपीकडून १लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त.

(PCB NEWS) गुन्हे शाखा युनिट ४ यांच्या पथकाकडून घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करून तपासामध्ये त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहे, आरोपीकडून १लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,
आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस ठाणे करीत आहे.

दि.२३/११/२०२२ रोजी युनिट-४ कडील स्टाफ खडकी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना सहा. पोलीस फौजदार प्रविण राजपुत व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आठ दिवसा पुर्वी धानोरी येथे घरफोडी करणारा मंजु पाटील हा मुळा रोड येथे एका दुचाकीवर बसुन कोणाची तरी वाट पहात आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, यांना कळविली असता त्यांनी बातमीचे ठिकाणी जावुन खात्री करुन मिळुन आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले.

लागलीच युनिट-४ कडील पथक तात्काळ बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता बातमीतील वर्णनाचा इसम एका हॉटेल समोर एका दुचाकीवर बसलेला दिसला. त्यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मल्लिकार्जुन ऊर्फ मंजु साहेबराव पाटील वय १९ वर्षे, रा.  सुखसागरनगर, कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने त्याचा मित्राच्या सोबतीने त्याचे ताब्यात मिळालेल्या दुचाकी मोटार सायकलवरुन सदरची घरफोडी केल्याचे सांगितले. त्याची अंगझती घेतली असता त्याचे खिशामध्ये. ५० हजार/-रू. व त्याचे ताब्यातील दुचाकी मोटार सायकल किंमत. रु. १ लाख असा एकुण रु. १ लाख ५० हजार - मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.

सदर बाबत विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३८२/२०२४ भा.न्या. सं. कलम ३३१ (३), ३३१(४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल असुन पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची उल्लेख नियकामगिरी, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट-४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, दिगंबर चव्हाण, सहा. पो. फौ. प्रविण राजपुत, यस्मीन सय्यद, पोलीस अंमलदार हरिष मोरे, अजय गायकवाड, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी, नागेशसिंग कुंवर, जहांगिर पठाण, मनोज सांगळे, वैभव रणपिसे, देविदास वाढरे, राहुल परदेशी, सुभाष आव्हाड, भरतगुंडवाड, विशाल ईथापे, महिला पोलीस अंमलदार रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, चालक सहा. पो. फौ. शितल शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments