(PCB NEWS) पुणे:दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील व पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ यांनी तडीपार केलेला आरोपी नामे पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव, रा. वारजे जकात नाका, पुणे हा त्याचे रहाते घराजवळ येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी स्टाफला रवाना करुन तडीपार इसम यास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदर बातमीची स्टाफची खातरजमा झाल्याने स्टाफने वरील ठिकाणी जावुन खात्री केली असता वरील नमुद वर्णनाचा इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव, वय २० वर्षे, रा. वारजे जकात नाका, पुणे असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या तडीपार इसमास पुणे शहरामध्ये येण्यासाठी कोणत्या पोलीस अधिकारी किंवा मा. न्यायालयाची पुर्व परवानगी घेतली नसल्याचे सांगुन, तसेच त्यास पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात येण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने त्याबाबत स्टाफने वारजे पोलीस स्टेशनकडील सदर इसमाचा तडीपार केलेला आदेश प्राप्त करून घेवुन तशी स्टाफची खात्री झाल्याने सदर तडीपार इसमाविरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ४५२/२०२४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर उत्तमनगर, वारजे व हिंजवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक, शाहीद शेख, पोलीस अंमलदार दत्तात्रय पवार, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, महेश पाटील, साईकुमार कारके, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड यांनी केली आहे.
0 Comments