पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांची धडक कारवाई विश्रांतवाडी परिसरातुन १ कोटीचे एम.डी ड्रग्ज जप्त, ३ आरोपींना अटक.

पुणे क्राईम बीट:- अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली, पथकातील पोलिस विश्रांतवाडी टिंगरे नगर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना दोन इसम हे संशयीत रित्या थांबलेले दिसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचा आणखी एक साथीदार, या तिघांकडून १ कोटी रुपयाचे एम.डी हा अंमली पदार्थ, चौकशी दरम्यान मिळून आले, त्यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, हे पुढील तपास करत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
दि.९/०८/२०२४ रोजी मा. पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक- १ गुन्हे शाख पुणे शहर यांचे सह पो. अधिकारी व पो. अंमलदार हे विश्रांतवाडी परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, सांवत पेट्रोल पंपा कडुन,५०९ चौका कडे पायी पेट्रोलिंग करीत जात असताना, एच. पी. पेट्रोल पंपासमोर  सार्वजनिक रोडवर, टिंगरे नगर, पुणे येथे रोडच्या कडेला एक मोटर सायकल वरील दोन इसम संशयीत रित्या कोणाची तरी वाट पाहत उभे असल्याचे दिसले. त्यांनतर आम्ही सदर इसमांच्या दिशेने जात असताना, ते आम्हास पाहुन तेथुन घाई घाईने गाडी चालु करुन निघुन जाऊ लागले असता सदर इसमाना जागीच पकडुन त्यांच्या कडे विचारपुस करता त्यांनी त्यांचे नावे, श्रीनिवास संतोष गोदजे व रोहित शांताराम बेंडे असे असल्याचे सांगितले, सदर इसमांचा संशय येताच त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे एकुण १लाख ९१हजार ६००/-रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर असा ऐवज मिळुन आला.

सदर इसमा कडे अधिक चौकशी करता त्यांनी सदरचा मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ त्याचा साथीदार नामे निमेश अबनावे याच्यासह विक्री करीत असल्याची माहिती दिली असता, लागलीच मा. पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी सदर मिळालेली माहिती हि मा. वरिष्ठ अधिकारी यांना देवुन पुढील कारवाई करता रवाना झाले. इसम नामे निमेश अबनावे यास आदर्श कॉलनी, रोड नं.२, विघ्नहर्ता अर्पाटमेंन्ट समोर, टिंगरे नगर, पुणे येथे सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. इसम निमेश अबनावे याची व त्याच्या ताब्यातील फोर व्हिलर कारची झडती घेतली असता. त्याच्या कडे एकुण रु.९८,८८,८६०/-रुपये किमतीचा एम.डी हा अंमली पदार्थ, दोन ईलेक्ट्रॉनिक वजन काटे, मोबाईल फोन व एक फोर व्हिलर कार मिळुन आले.

वर नमुद ताब्यातील ०३ इसमांन कडुन एकुण किं.रु.१,००,८०,४६०/- चा ऐवज त्यामध्ये कि रु.९४,२६,३६०/-चा ४७१ ग्रॅम ३१८ मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, कि.रु ८२,०००/- चे ०४ मोबाईल फोन, कि. रु.७०,०००/- रु.ची दुचाकी, किं. रु.५,००,०००/- ची एक फोर व्हिलर कार, किं.रु.२,०००/-दोन इलेक्ट्रिक वजन काटा व इतर असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. म्हणुन त्याचे विरुध्द विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं.२६३/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजन शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो. आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उप निरीक्षक दिंगबर कोकाटे, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, सचिन माळवे, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहना शेख, नुतन वारे, नितेश जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments