पुणे:- माजी लष्करी अधिकाऱ्याकडून,२६२ नागरिकांची २६ कोटी, ४१ लाख, ४० हजाराची फसवणुक. मुंढवा पोलिसांकडून तपास सुरू.


पुणे क्राईम बीट:- पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, सर्वात जास्त पुणे शहरांमध्ये सायबर गुन्ह्यांची वाढ होत असताना, मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, असलेल्या बी.टी कवडे रोड, येथे एका माजी लष्करी अधिकाऱ्याने एस जी ट्रेडर्स कंपनीच्या नावाने नागरिकांना कोट्यावधीला लुबाडल्याची घटना समोर आली आहे, मुंढवा पोलीस स्टेशन यासंदर्भात तपास करत आहे, २६ कोटी, ४१ लाख, ४० हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो, यासंदर्भात रोज चार पाच तक्रारी अर्ज मुंढवा पोलीस स्टेशन येथे फसवणूक झालेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.


बी.टी. कवडे रोड भागात एस. जी. ट्रेडींग कंपनीकडून नागरिकांना जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून २६२ नागरिकांची रुपये २६,४१,४०,००० ची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे तक्रारदार यांनी प्रथम वी.टी कवडे रोड सॅफरोन हॉटेल बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावर एस. जी ट्रेडर्स या कंपनीचे मालक सुरेश आण्णाप्पा गाडीवडार व इतर यांनी गुंतवणुक रक्कमेवर महिन्याला ५ टक्के परतावा देतो असे अमिष दाखवून ३१ लाख, रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले, गुंतवणुक रक्कम तसेच रक्कम परतावा न दिले बाबत अर्जदार यांची तक्रार प्राप्त झाली.

सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ चौकशी चालू केली असता चौकशी कालावधीमध्ये सदर प्रकरणी मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारी अर्ज चौकशीअंती एस.जी. ट्रेडर्स, शेअर ट्रेडींग कंपनीचे मालक सुरेश गाडीवड्डार, सुभाष गाडीवड्डार, शुभांगी मोहिते, निकिता, किरण दलाल, सौरभ, गंगाधर यांनी माहे जानेवारी २०२० ते माहे मे २०२४ या कालवधीमध्ये लोकांचे विश्वास संपादन करुन, त्याचे कंपनी मध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडुन, परताव्याचे आमिष दाखवुन, त्यांचे गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेले पैसे परत न करता, एकुण २६२ लोकांची सुमारे २६,४१,४०,०००/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अद्यापही लोकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने फसवणुक रक्कमेत आणखीन वाढ होणार आहे.

मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३२५/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६, ४२०, ३४, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थेमधील) हित संवधांचे सरंक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा. वरिष्ठांचे सुचना प्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. बाबासाहेब निकम मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments