धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सरहद स्कूल मध्ये घर घर तिरंगा हर घर तिरंगा शासनाच्या उपक्रमांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रभाग क्रमांक ४२, आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व सन ब्राईट स्कूल या
शाळेमध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली. थोरवे शाळा म.न.पा. चंद्रभागा चौक येथे तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत अहिल्यादेवी होळकर शाळा चव्हाण नगर येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाचे सर्व
सेवक व अधिकारी यांनी घरोघरी तिरंगा
याची प्रतिज्ञा घेतली व परिसरामध्ये प्रभात फेरी घेऊन नागरिकांना या अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली.
घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील नामवंत व्यक्ती पैकी ज्येष्ठ अभिनेते श्री आनंद इंगळे यांचा त्यांचे निवास स्थानी तिरंगा देऊन सत्कार व वंदना करण्यात आले आहे. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत वारजे कर्वेनगर
वॉर्ड ऑफिसच्या कार्यकक्षेतील नामवंत व्यक्ती पैकी भारतीय क्रिकेट खेळाडू श्री. केदार जाधव यांचा त्यांचे निवास स्थानी
तिरंगा देऊन सत्कार करण्यात आले आहे.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत लोहगाव येथील श्री संत तुकाराम प्राथमिक विद्यालय येथे "हर घर तिरंगा घरघर तिरंगा" या अभियानांतर्गत रॅली तसेच तिरंगा शपथ घेण्यात आली. संत गोरोबा बालविद्यानिकेतन विमान नगर येथे प्रतिज्ञा घेण्यात आली.
मनपा शाळा क्रमांक ८३ मुलांची माळवाडी हडपसर येथे घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
आमदार सूर्यकांत लोणकर शाळा क्रमांक १०८ बी. सिद्धार्थ नगर कोंढवा येथे तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तर्फे ब्रँड अँबेसिडर यांच्यासह १५ ऑगस्ट निमित्त भारतीय विद्यापीठ मागील गेट व्यापारी
भागात डीपी क्लीन ड्राईव्ह घेण्यात आला. यावेळी घरोघरी तिरंगा या उपक्रमा निमित्त धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय सुरेखा भणगे मॅडम, सहाय्यक आयुक्त यांच्या हस्ते घरोघरी लावण्यासाठी तिरंगा ध्वज देण्यात आला.
नानासाहेब पेशवे तलाव उद्यान कात्रज व स्वामी विवेकानंद उद्यान कोंढवा तसेच शिवरकर उद्यान, वानवडी येथे नागरिकांकरिता सेल्फी पोईण्ट
उभारण्यात आला आहे.
0 Comments