पुणे- मोबाईल जबरी चोरी करणारा आरोपी युनिट २ गुन्हे शाखा यांच्या ताब्यात.

दिनांक २३/०८/२०२४ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे हददीत युनिट २ कडील पथक हे पुणे स्टेशन परिसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे व पुष्पेंद्र चव्हाण यांना एक व्यक्ती संशयित रित्या मिळाला असता गस्त करीत असलेल्या युनिट पथकाने त्या व्यक्तीला  ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रामू भिमराजू आवला वय ३२ वर्ष रा.मु. पो. शहापुरा, थाना आस्का, जि गंजम राज्य ओडीसा असे सांगीतले. सदर इसमाकडुन त्याने दिंनाक २२/०८/२०२४ रोजी जबरी चोरी केलेले एकुण ४ मोबाईल फोन कि.रु. ७३ हजार रु.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

खालील प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे ३ गुन्हे उघडकीस आले आहे, 

२) स्वारगेट पोलीस स्टेशन येथील १ गुन्हा उघड.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिगंळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे१ श्री. गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि राजेंद्र पाटोळे व युनिट २ कडील पोलीस अंमलदार नेवसे, जाधव, मोकाशी कुंभार महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे शिंदे व चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments