पुणे:-मॅफेड्रॉन, एम.डी. ७ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त, विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल, अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा यांची कारवाई.

पुणे क्राईम बीट:- पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार यांनी सूचना दिले होते, त्याच अनुषंगाने पुणे शहरामध्ये ठीक ठिकाणी गुन्हे शाखेकडून छापा कारवाई करण्यात येत आहे, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक २ हे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक यांना माहिती मिळाली की, रविवार पेठ येथील एका व्यक्तीकडे एमडी हा अमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांनी सदर माहितीच्या ठिकाणी जाऊन, सागर जयसिंग चव्हाण, वय ३४ वर्षे, रा.गायत्री भवन शेजारी, रविवार पेठ, पुणे याच्या ताब्यात एकुण ७ लाख, रुपये किमतीचा ऐवज मॅफेड्रॉन (एम.डी.), हा अंमली पदार्थ मिळून आल्यामुळे आरोपीवर  फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अंमलदार हे फरासखाना पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १४/०८/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार साहिल शेख यांना मिळाले माहितीवरून दिशा जिन्स शॉप समोर, मिरादातार दर्गा रोड, रविवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक रोडवर इसम नामे सागर जयसिंग चव्हाण, वय ३४ वर्षे, रा. १०९०, गायत्री भवन शेजारी, रविवार पेठ, पुणे याच्या ताब्यात एकुण ७ लाख,रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ६ लाख ४० हजार रु. किं.३२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), हा अंमली पदार्थ व इतर ऐवज असे बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने पोलीस अंमलदार साहिल शेख यांनी त्याचेविरुध्द फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गु.र.नं. १६३/२०२४ एन.डी. पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), अन्वये दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार साहिल शेख, अझीम शेख, चेतन गायकवाड, रविन्द्र रोकडे, संदिप जाधव, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, निलम पाटिल, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments