पुणे क्राईम बीट :- अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, व अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी पासून दूर ठेवण्यासाठी व त्यांच्यात बदलाव आणण्यासाठी, पुणे पोलिसांकडून अल्पवयीन गुन्हेगारांसाठी २०२३ पासून परिवर्तन उपक्रम राबवला जात आहे, त्यामध्ये मुलांकडून घड्याळ, चटई, पिशव्या, या कला कौशल्य वस्तू त्यांच्याकडून बनवून घेण्यात येत आहे जेणेकरून मुले भविष्यामध्ये चुकीचा मार्ग न निवडता चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतात, व शिक्षणाची आवड त्यांना होईल, या मुलांकडून या वस्तू बनवून घेऊन त्या बदले त्यांना मोबदला देखील दिला जाणार आहे, पहिल्या टप्प्यात एकूण १५० अल्पवयीन मुलांची चटई, घड्याळे, पिशव्या आणि मूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
पुणे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की गाड्यांची तोडफोड असो की मारामारी भांडणे व धारदार हत्यारे बाळगणे दहशत निर्माण करणे, यामध्ये अल्पवयीन मुलांचा जास्त समावेश असल्याचे दिसून येत आहे, गाड्यांची तोडफोड यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलीस बऱ्याच वेळा या अल्पवयीन मुलांना अटक करून सोडून दिल्यानंतर परत अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात असे दिसून येते. या सर्व गोष्टीचा विचार करून पुणे पोलिसांकडून,( संस्था व एनजीओ) यांच्या माध्यमातून, अल्पवयीन मुलांच्या जीवनामध्ये बदलाव करण्यासाठी व त्यांना गुन्हेगारी पासून दूर ठेवण्यासाठी हे उपक्रम राबवण्यात येत आहे.
पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा यांनी, परिवर्तन उपक्रमाचे सकारात्मक दिसत असल्याचे स्वारगेट पोलीस स्टेशन येथील कार्यक्रमात माहिती देताना सांगितले,
१०० पेक्षा अधिक मुलांनी सांगितले की आम्ही गुन्हेगारी मध्ये पडलो होतो, आता आमच्या मध्ये सुधार झालेला आहे, पुणे पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आहे आणि आमच्या भविष्यासाठी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शन केले आहे आणि आम्हाला मदत केली आहे, त्याबद्दल आम्ही सर्व,पुणे पोलिसांचे खूप खूप आभार मानतो.
0 Comments