पुणे क्राईम बीट:- कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या, त्याच अनुषंगाने कोंढवा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की दोन इसम हे खडी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणाऱ्या पेट्रोल पंप या ठिकाणी पेंशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. पोलिसांना संशय आल्याने त्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता सदर आरोपी हे विधी संघर्षित बालक असल्याचे समजले,विधी संघर्ष बालकांकडून एकूण ९ मोटर सायकल जप्त करण्यात आले, वाहनांची एकूण किंमत ३ लाख ६० हजार रुपये, असल्याचे समोर आले आहे, विधी संघर्षित बालकाकडून ९ गुन्हे उघड करण्यात आले आहे.
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हे खडी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळे व निळे रंगाची पेंशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. सदर मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी कोंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथक स्टाफ शोध घेणकामी गेले असता त्याठिकाणी दोन इसम हे त्याच्याकडील बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल चालु करित होते. तेव्हा त्याच्याकडे असणारी मोटार सायकल चोरीची असल्याचा संशय वाटल्याने त्यांना ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता ते विधी. संघर्षग्रस्त बालक असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याच्याकडे मिळुन आलेल्या दुचाकी वाहन
बाबत चौकशी केली असता ते उडवाडवीचे उत्तरे देवु लागले तेव्हा त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेली पॅशन मोटर सायकल ही काकडे पॅलेस कर्वेनगर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता एकुण ९ गुन्हे उघड होवुन ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या वाहने जप्त करण्यात आलेल्या आहेत.
वरिलप्रमाणे कामगिरी ही, मा. पोलीस उप आयुक्त परि. ५ श्री.आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धंन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोउपनिरी बालाजी डिंगोळे, पो. अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे.
0 Comments