पुणे क्राईम बीट:- पुणे शहरातील नैसर्गिक व सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या तळजाई टेकडी, येथे दारूच्या बाटल्या व सिगारेट च्या मोकळ्या पाकिटा भरपूर ठिकाणी या परिसरामध्ये दिसून येतात,
या संदर्भात येथे फिरायला व पायी चालण्यासाठी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर, माहिती दिली की या परिसरामध्ये दिवसाढवळ्या देखील दारू पिणारे काही ठिकाणी बसलेले असतात, त्यांना काही म्हटले तर ते भांडायला उठतात यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, या परिसरामध्ये दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे जेणेकरून येथील परिसर स्वच्छ राहील आणि नागरिकांमध्ये भीती राहणार नाही, या ठिकाणी, अनेक लोक आपल्या फॅमिली सोबत लहान मुलासोबत येतात, हे दारूचे बाटल्या ठीक ठिकाणी पडलेले सिगारेटचे पाकीट, व ठीक ठिकाणी अस्वच्छता यामुळे येथील परिसर हळूहळू कचऱ्याचे ठिकाण होत आहे का, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे,
ज्येष्ठ नागरिक, श्री आयुब खान यांनी सांगितले तळजाई परिसर हे खूप सुंदर आहे, येथील झाडाझुडपांचा परिसर दिसायला देखील खूप सुंदर दिसते, परंतु येथे बऱ्याच ठिकाणी दारूच्या बाटल्या व सिगारेट पडलेले असतात, या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बनवण्यात आलेल्या मार्बल चे बाकडे यांच्या मागे कचरा दारूचे बाटल्या प्लास्टिकचे ग्लास, हे सर्व स्वच्छ करण्यात यावे व या परिसरात दारू पिणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात यावी, असे ज्येष्ठ नागरिक श्री अयुब खान यांनी सांगितले.
विक्रम काथवटे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, कार्यालय धनकवडी-सहकारनगर, पीएमसी म्हणाले, "झोपडपट्टी भागातील काही लोक या ठिकाणी दारू पितात धूम्रपान करतात या ठिकाणी उद्यान विभागाचे सुरक्षा रक्षक आहेत, सुरक्षारक्षक हे सायंकाळी ६ वाजेपर्यंत असतात त्यानंतर येथील झोपडपट्टी मधील काही लोक या ठिकाणी येऊन दारू पितात व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात.
दीड महिन्यापूर्वी आम्ही सहकारनगर पोलिस ठाण्याला परिस्थितीबाबत कळवून, तक्रारी पत्र दिले आहे, आम्ही स्वच्छतेसाठी एक टीम पाठवून तेथील परिसर स्वच्छ करून घेणार आहोत,असे काथवटे यांनी सांगितले.
0 Comments