पुणे: लोणीकंद पोलिसांकडून जुगार अड्यावर छापा टाकुन कारवाई.रोख रक्कम, चार चाकी वाहन, व जुगार खेळण्याचे साहीत्य असे एकुण ४ लाख, ४३ हजार ,८१० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त.

फडई चौक, इमारतीच्या टेरेसवरील खोलीमध्ये जुगार चालू असल्याची माहीती मिळाली सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन छापा  कारवाई करून 
सदर मुद्देमाल जप्त करून, व जुगार खेळणारे आणि जुगार चालवणारा,५ इसमाविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ), ४ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
रोख रक्कम, चार चाकी वाहन, व जुगार खेळण्याचे साहीत्य असे एकुण ४,४३,८१०/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे,


दिनांक ०१/०७/२०२४ रोजी फडई चौक, इमारतीच्या टेरेसवरील खोलीमध्ये जुगार चालू असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाल्यावरुन सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे प्राप्त बातमीचे अनुशंगाने छापा टाकला असता सदर ठिकाणी १ जुगार चालक इसम व इतर ४ खेळाडु इसम हे १३ पत्ते रम्मी जुगार खेळताना मिळुन आल्याने त्यांचेकडुन रोख रक्कम, चार चाकी वाहन, व जुगार खेळण्याचे साहीत्य असे एकुण ४,४३,८१०/- रु किंमतीचा मुददेमाल जागीच जप्त करुन सदरचे ५ इसमाविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ), ४ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४. श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर श्री. विठठल दबडे, लोणीकंद पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सावळाराम साळगावकर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, म. सपोनि विजया वंजारी, पोलीस अंमलदार तिकोणे, जगताप, फरांदे, जाधव, ढोणे, लोहार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments