पुणे:- सायबर पोलिसांनी नामांकित ब्रोकर कंपन्याकडील ग्राहकांचे डि मॅट अकाउंट हॅक करून कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या आरोपीला चेन्नई तामिळनाडू येथून अटक केली आहे.

नामांकीत ब्रोकर कंपन्यांकडील विविध ग्राहकांचे डी मॅट अकाऊंट हॅक करून कोट्यावधींची फसवणुक करणाऱ्या प्रमुख आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी चेन्नई तामिळनाडू येथून अटक केली आहे.
सायबर पोलिसांकडून चेन्नई तामिळनाडू येथून आरोपी नामे व्यंकटेशन वर्धन यास अटक केली आहे. आरोपीने पुण्यातील फिर्यादी यांचे डी मॅट अकाऊंटचा प्रायमरी मेल आय डी व प्रायमरी मोबाईल क्रमांक आरोपीने बदलुन, स्वतःचा मेल आय डी व मोबाईल क्रमांक लिंक करून दाखल गुन्हयातील फिर्यादीचे डी मॅट अकाऊंटवरील ७० लाख रूपयांचे शेअर्स आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे पुढील तपास सायबर पोलीस करत आहे

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील गुर नं ३६६/२०२४, भादवि कलम ४२०,४१९ , सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये चेन्नई तामिळनाडू येथून आरोपी नामे व्यंकटेशन वर्धन यास अटक केली आहे. सदर आरोपीने पुण्यातील फिर्यादी यांचे डी मॅट अकाऊंटचा प्रायमरी मेल आय डी व प्रायमरी मोबाईल क्रमांक आरोपीने अनधिकृतपणे बदलुन, स्वतःचा मेल आय डी व मोबाईल क्रमांक लिंक करून दाखल गुन्हयातील फिर्यादीचे डी मॅट अकाऊंटवरील शेअर्स स्वतःचे डी मॅट अकाऊंटला ट्रान्सफर केले. दाखल गुन्ह्यातील ७० लाख रूपयांचे शेअर्स अटक आरोपीने फिर्यादीचे सीडीएसएल या डिपॉझीटरीला लिंक असलेले डी मॅट अकाउंट हॅक करून स्वतःचे बजाज सिक्युरिटीज डी मॅट अकाउंटला ट्रान्सफर करून घेवून ते शेअर्स विकुन स्वतःच्या पंजाब नॅशनल बँक खाते क्र. या खात्यावर रक्कम वर्ग करून घेतली व चेन्नईमधील वेगवेगळ्या एटीएमव्दारे व चेकव्दारे काढून घेतली.

आरोपी व्यंकटेशन वर्धन याने सिडको पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथील गुरनं. ४६९/२०२४ या गुन्ह्यातील फिर्यादी यांचेबरोबर अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी व्यंकटेशन वर्धन याने अशाच प्रकारची फसवणूक आणखीन किती व्यक्तीसोबत केलेली आहे आरोपीस डिमॅट अकाउंट आयडी व पासवर्ड सीडीएसएलमधून कशाप्रकारे मिळाला याबाबत पुढील तपास श्री. सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर सायबर पोलीस करीत आहेत.

तसेच पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन यांचेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अन्य कोणासोबत अशाप्रकारची फसवणूक झाली असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे मा. पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे श्री. विक्रांत देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील वपो.नि. सुरेश शिंदे, हिमालय जोशी पोलीस उप निरीक्षक, सचिन इनामदार पोलीस अंमलदार, रवि राठोड दिनेश मरकड, सचिन शिंदे यांनी केली

Post a Comment

0 Comments