पुणे: खडक पोलीसांची अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून एकूण १० लाख ,२१ हजार ,२०० किंमतीचा मुद्देमाल जप्त.

पुणे पोलीस आयुक्त, श्री मितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या माफियांना पोलिस आयुक्तालयात बोलावून झाडाझडती करण्यात आली होती व त्यांना संक्त ताकीद देण्यात आली होती, यापुढे गुटखा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी त्यांना सूचना देखील देण्यात आली होती, खडक पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गुटखा विक्री करत असल्याची माहिती, खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना मिळाली होती, खडक पोलिसांनी, सोनमार्ग थेटरच्या समोर लोहीयानगर पुणे याठिकाणी जाऊन मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना, २ पॅगो कंपनीचे टेम्पो मिळून आले, टेम्पो तपासले असता, 
विमल पान मसाला, प्रिमीयम राज निवास सुगंधित पान मसाला, प्रीमियम झेड एल १ जाफरानी जर्दा, वी-१ तंम्बाकु असे प्रतिबंधीत गुटखा पान मसाला, ६ लाख, १९ हजार, ७००/- रुपये किंमतीचे
 व ४ लाक,१ हजार,५००/- रुपये किंमतीचे दोन पॅगो कंपनीचे टेम्पो, 
असे एकुण मिळुन १० लाख,२१ हजार, २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने खडक पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, खडक पोलीस पुढील तपास करत आहे.

खडक पोलीस स्टेशनमध्ये नुकताच कार्यभार स्वीकारलेले मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे व मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष खेतमाळस यांनी स्वाकारलेले आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदयाचे अनुषंगाने ऑपरेशन ऑल-आऊट व ऑपरेशन वॉश-आऊट राबविण्यासाठी त्यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक १३/०७/२०२४ रोजी लोहियानगर परिसर व काशेवाडी परिसर येथील भागात मटका, जुगार, अवैध गुटखा, दारुचे धंदे याबाबत माहिती घेण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काइंगडे यांना त्यांचे गुप्त बातमीदराकडून बातमी मिळाली की, विराणी स्टीलची गल्लीमध्ये सोनमार्ग थेटरच्या समोर लोहीयानगर पुणे याठिकाणी टेम्पो क्र.१) MH- 12 JF1277 २) MH-12 LT 2620 यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत तंवाखु या मालाची एक इसम टेम्पोमध्ये विक्री करीत असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली आहे. अशी बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांनी खडक पोलीस स्टेशनकडील मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संतोष खेतमाळस व तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार २८४२ दुडम, पो.शि. पोशि ९१०२ वाबळे, पोशि ८९३८ ढावरे असे रवाना केले. अशा गुटख्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात येवुन त्याच्या शरीरावर विपरीत परीणाम होत असल्याने त्यानुसार प्रल्हाद डोंगळे व त्यांच्या टिम रवाना होवून त्यांनी त्यांची वाहने एका विशिष्ट अंतरावरती लावुन येथे जावुन एक इसम विराणी स्टीलची गल्लीमध्ये सोनमार्ग थेटरच्या समोर लोहीयानगर पुणे याठिकाणी टेम्पो क्र.१) MH-12 JF1277 २) MH-12 LT 2620 या वाहनांमध्ये माल ठेवुन टेम्पोला लॉक लावत असताना मिळुन आला त्यातील एकूण ४,०१,५००/- रुपये किंमतीचे दोन पॅगो कंपनीचे टेम्पो व ६.१९,७००/- रुपये किंमतीचे विमल पान मसाला, प्रिमीयम राज निवास सुगंधित पान मसाला, प्रीमियम झेड एल -०१ जाफरानी जर्दा, वी-१ तंम्बाकु असे प्रतिबंधीत गुटखा पान मसाला असे एकुण मिळुन १०,२१,२००/- रुपये किंमतीचा मुद्येमाल प्रतिबंधीत पदार्थाची विक्री करीता साठवणूक करून मिळून आला. त्या अनुषंगाने खडक पोलीस स्टेशनला दिनांक १४/०७/२०२४ रोजी गुन्हा रजि. नं. २३८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३,२२३.२७४,२७५.३(५) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), ३१(१), २६ (२) (I) २६(२) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयात गुटखाधारक चालक आरोपी नामे आकिब शकील शेख, वय ३२ वर्षे रा.५४ - ए.पी. लोहीयानगर, पुणे यांचेविरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपी यांनी गुटखा कोठून आणला, कोणाकडून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केला, व पोलीस ठाणे हद्दीमध्ये अजून कोणाकडे अवैध गुटखा सुरू आहे सदर आरोपी याला मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला ३ दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती. सध्या आरोपी याला मा. कोर्टाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सध्या पाहिजे आरोपीचा शोध घेवून गुटख्याची पुढील चेन उध्दवस्त करण्याचे काम सुरू आहे. तरी याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

नमूद कारवाई श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व सहा. पोलीस आयुक्त श्री. मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष खेतमाळस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, लखन ढावरे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले आशिष चव्हाण, इरफान नदाफ, भालचंद्र दिवटे, दिनेश अवघडे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments