कोंढवा व पुणे शहरातील नागरिकांचे मोबाईल मोटरसायकल वरून येऊन जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या आरोपीला अटक, एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश,

पुणे क्राईम बीट :- नागरिकांचे मोबाईल दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या एका आरोपीला कोंडवा पोलिसांनी अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती कोंढवा पोलिसांकडून मिळाली आहे,
मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेल्याची तक्रार कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती, याच अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन हे आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की,मोबाईल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा शिवनेरीनगर,कोंढवा  पुणे येथे असल्याची माहिती मिळाली, कोंढवा पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन, आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव उमर सलीम शेख, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे असे असल्याची माहिती मिळाली आहे, सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासह केल्याचे मान्य केले असून सदर आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली ४०,०००/- रू. किं.ची एक होंडा शाईन दुचाकी गाडी तसेच ८६ हजार रू किंमतीचे १० मोबाईल फोन असा एकुण१ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की,
दिनांक ०८/०६/२०२४ रोजी रात्रौ ००/१५ वा.च्या सुमारास ताहेरी क्लिनीक समोर, साळुंखे विहार रोड, कोंढवा खुर्द, पुणे येथे फिर्यादी वय १७ वर्षे, रा. साळुंखे विहार टेलिफोन एक्स्चेंज समोर, कोंढवा खु. पुणे हे जेवण करून वॉकिंग करीत असताना एका दुचाकी गाडीवरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या हातातून त्यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले होते त्या अनुषंगाने कोंढवा पोस्टे येथे गु.र.नं.६६२/२०२४, भा.दं.वि. कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कोंढवा तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार निलेश देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा मोबाईल फोन हा इसम नामे उमर सलीम शेख, रा. गल्ली नं.१, पिताश्री आश्रम जवळ, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे याने केल्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहिद शेख व लक्ष्मण होळकर, यांनी सदर आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासह केल्याचे मान्य केले असून सदर आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली ४०,०००/- रू. किं.ची एक होंडा शाईन दुचाकी गाडी तसेच ८६ हजार रू किंमतीचे १० मोबाईल फोन असा एकुण१ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून,

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं.११९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४) हा गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे.

वरिल नमुद कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परि.५. श्री.आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, गणेश इंगळे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री. संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्रीमती रूणाल मुल्ला, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री. मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अमंलदार निलेश देसाई, विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सागर भोसले, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments