पुणे क्राईम बीट :- कोंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उंड्री चौकी हद्दीमध्ये मिलेनियम लेबर कॅम्प येथे कामगारांमध्ये भांडण झाल्याची माहिती,
उंड्री चौकी मार्शल यांना माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता, दोन लेबर मध्ये जेवणाच्या कारणावरून वाद झाले होते,
दुपारी २ ते २.३०, वाजताच्या सुमारास,
आरोपी कमल नारायण मार्डी, वय ४९ वर्ष राहणार जालघर जियापुर पश्चिम बंगाल, याने लेबर कॅम्प मधील कॅन्टीन मध्ये काम करणारा शेफ,नामे शुभम शास्त्री सरकार ( मयत) वय ६३ याचे नाकावर हातोडा मारून त्याच गंभीर जखमी केले सदर जखमी यास ससून हॉस्पिटल येथे उपचार साठी घेऊन गेले असताना, डॉक्टरांनी शुभम शास्त्री सरकार याचे मृत्यू झाल्याचे सांगितले.
तसेच साक्षीदार रामप्रीत मंडल याच्या डोक्यात देखील हातोडा मारून जखमी केले आहे. आरोपी कमल मार्डी याला कोंढवा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे, पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.
0 Comments