पुणे:- येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी जीवनात बदल घडण्याच्या दृष्टीकोनातून माणुस या जीवनाचा अर्थ व जीवन कसे जगावे या विषयावर आधारीत व्याख्यान आयोजित करण्यात आले.श्री.यशवंत महाराज फाले यांनी किर्तन प्रवचनाव्दारे मार्गदर्शन केले.

श्री. सुमित दरंदले, पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय वारकरी संघ यांचेवतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी जीवनात बदल घडण्याच्या दृष्टीकोनातून माणुस या जीवनाचा अर्थ व जीवन कसे जगावे या विषयावर आधारीत व्याख्यान दि.१४.०७.२०२४ रोजी आयोजित करण्यात आले. त्यावेळी शिवचरित्रकार, समाजभुषण पुरस्कर्ते व जीवन गौरव पुरस्कारकर्ते ह. भ. प श्री. यशवंत महाराज फाले यांनी किर्तनपर प्रवचनाव्दारे बंद्यांना मार्गदर्शन केले.
कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीजनांच्या मनात जीवन जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल. सदर उपक्रम मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्री. आर ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एस.एम.पाडुळे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. आर के कानडे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य, श्री. सुमित दरंदले व इतर सहकारी यांनी कामकाज पाहीले.

Post a Comment

0 Comments