खडक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सराईत वाहन चोराला अटक,चोरीच्या २ लाख, ३५ हजार,- रुपये किंमतीच्या ७ मोटारसायकल जप्त

खडक पोलीस स्टेशन हद्दीमधील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे तपास पथक हे पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की रविवार पेठ येथे एक इसम थांबला आहे त्याच्याकडे चोरीचे वाहन असल्याची माहिती आहे सदरची बातमी खडक पोलिसांनी वरिष्ठांना कळवून त्या ठिकाणी जाऊन आरोपीला अटक करून सदर आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने वाहन चोरी केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून ७ मोटर सायकल वाहन मिळून आले आहे, त्यांची किंमत एकूण २ लाख ३५ हजार असल्याची खडक पोलिसांकडून माहिती मिळाली आहे, सदर आरोपीला अटक करून पुढील तपास पोलीस करत आहे.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री संपतराव राऊत यांनी खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ पोहवा २८४२ दुडम, पोहवा ९१५ ठवरे, पो.हवा.६८५१ तळेकर, पो.शि. ९११८ भोसले, पोशि ९१०२ वाबळे, पो.शि. बडदे, पोशि ८९४८ चव्हाण, पोशि ८९३८ ढावरे, पो.शि. ५१६३ इरफान नदाफ, पो.शि. ३१८५ कुडले. पो.शि.८४५४ नदाफ असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार प्रमोद भोसले, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, साधारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रभूषण चौक, खेडेकर ऑफिस येथील केक अॅन्ड जॉय शॉप दुकानासमोरील रोडवरून बजाज पल्सर MH 12 GH 9178 हि गाडी चोरणारा इसम हा भांडेआळी रविवार पेठ पुणे येथे थांबला असुन सदरचा इसम हा अंगाने मध्यम बांधा, रंगाने गोरा, अंगात पांढ-या रंगाचा शर्ट, निळी रंगाची पॅन्ट असे कपडे परिधान केलेले" अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन यांना कळविली असता, त्यांनी सदरच्या इसमास ताब्यात घेणेबाबत मौखीक आदेश दिल्याने लागलीच आम्ही स्वतः व तपास पथकातील वरील नमुद पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जावुन प्राप्त वर्णनाप्रमाणे इसम व बजाज पल्सर MH 12 GH 9178 गाडी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता गोवर्धनप्रसाद ललवा साहु, वय-३५ वर्षे, रा.स.नं.१२० किष्कींदानगर पौड रोड दत्त मंदिराजवळ कोथरुड पुणे, मुळ पत्ता-गांव भोडसा, पोस्ट-कौडीया, ता. चदिया जिल्हा-उमरीया राज्य- मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातील बजाज पल्सर MH 12 GH 9178 गाडीचे मालकाबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता तो गाडीचे मालकाबाबत विसंगत माहीती देऊ लागल्याने आम्ही त्यास विश्वासात घेवुन त्याचे ताब्यातील गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, राष्ट्रभूष्ण चौक, खेडेकर ऑफिस येथील केक अॅन्ड जॉय शॉप दुकानासमोरील रोडवरून पुणे येथुन चोरली असल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक यांनी तपास पथकाचे सहाय्याने अधिक तपास करता त्यांच्याकडून चोरीच्या २,३५०००/- रुपये किंमतीच्या ०७ मोटारसायकल जप्त केल्या असून सध्या खडक पो.स्टे. चे ०२ गुन्हे उघडकीस आणून इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरू आहे.

नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पवार पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, श्री. अजीज बेग पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, , लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments