कोंढवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
सकाळी ११.४५. वा. दरम्यान कंट्रोलचा कॉल आला की, केसर लॉज च्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या खड्ड्यांमध्ये चार मुली पाण्यात पडलेल्या आहेत अग्निशामक दल बोलविण्यात आले होते, मुलींच्या नातेवाईकांनी तीन मुलींना वाचवून बाहेर काढले ,व चौथी मुलगी ही बाहेर काढण्यात आली तिचे नाव मुस्कान शीलावत असे आहे .
रोडच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठले होते तेथे कपडे धुण्यासाठी सकाळी ११ वा. च्या दरम्यान गेल्या असताना, त्या मुलींपैकी मुस्कान देवा शीलावतीची चप्पल पाण्यामध्ये पडली म्हणून ती चप्पल काढण्यासाठी पाण्यात गेली , व पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. त्यावेळी इतर ३ मुली तिला वाचवण्यासाठी गेल्या असताना, एकपाठोपाठ त्याही बुडू लागल्या त्यावेळी, तिथे असणारी अजून १० वर्षाची मुलगी हिने तिच्या इतर नातेवाईक याना पळत जावून कळविले असता, त्यांच्या पालातील जगदीश छगन शिलावत व रमेश शिलावत यांनी तीन मुलींना बाहेर काढले व त्यांनतर चौथी मुलगी मुस्कान शिलावत हीलाही बाहेर काढले, परंतु तिची प्रकृती खूप चिंताजनक होती म्हणून तिला नजीकच्या पोटे हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आले . तेथील डॉक्टरांनी मुस्कान हिची तपासणी करून ती मयत झाले असल्याबाबत कळविले ,म्हणून पुढील कारवाईसाठी मुस्कान शिलावत हिस ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. मयत मुलीचे कुटुंब हे त्या ठिकाणी राहत असून ४ महिन्यापासून नमुद ठिकाणी राहण्यासाठी आले आहेत. चाकू- सुरी याना धार लावणे व चादर विक्री अशी कामे करुन त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
0 Comments