फिर्यादी, सकाळी राहते घरापासुन मॉर्निंग वॉक करित मोबाईल वरुन गाणी ऐकत असताना त्याच्या हातातील आयफोन मोबाईल हा एका अनोळखी मोपेड दुचाकीवरील इसमाने हिसकावुन चोरी केला होता. सदर बाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
सदर गुन्ह्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली, सदर आरोपी हा सायंकाळच्या सुमारास हांडेवाडी चौकात चहा पिण्यासाठी व मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. कोंढवा पोलिसांनी हांडेवाडी चौकात सापळा रचुन आरोपीला अटक करण्यात आले आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सांगरीया सोसायटी, दोराबजी मॉलजवळ फिर्यादी हे दि ११/०५/२०२४ रोजी सकाळी ०६/३०वा ते सकाळी ०६/४५ दरम्यान सकाळी राहते घरापासुन मॉर्निंग वॉक करित मोबाईल वरुन गाणी ऐकत असताना त्याच्या हातातील आयफोन मोबाईल फोन हा एका अनोळखी मोपेड दुचाकीवरील इसमाने हिसकावुन चोरी केला होता. सदर बाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरनं.५३३/२०२४ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक मानसिग पाटील यांनी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, तपास पथकातील पोलीस अंमलदार असे घटनास्थळाच्या आजुबाजुला असणा-या सीसीटिव्हिच्या माध्यमातुन तांत्रिक विश्लेषन करुन नमुद गुन्हा हा हादीहासन सर्फराज इराणी, वय २३ वर्षे, रा. न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न करुन सदर आरोपी हा सायंकाळच्या सुमारास हांडेवाडी चौकात चहा पिण्यासाठी व मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने दि.२२/०५/२०२४ रोजी वरिल स्टाफच्या मदतीने हांडेवाडी चौकात सापळा रचुन थांबलो असताना नमुद आरोपी आलेला दिसला. त्यास स्टाफच्या मदतीने पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यास नाव पत्ता विचारता त्याने हादीहासन सर्फराज इराणी, वय २३ वर्षे, रा. न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी, आंब्याच्या झाडाच्या जवळ हांडेवाडी रोड, हडपसर पुणे असे सांगितले. तेव्हा त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत चोरी केलेला आयफोन मोबाईल फोन मिळुन आला आहे. सदर मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे हे करित आहे.
वरिल प्रमाणे कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि. ५ श्री.आर. राजा मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, विकास मरगळे, शशांक खाडे, अक्षय शेंडगे, अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, सुहास मोरे, राहुल थोरात यांनी केली आहे.
0 Comments