१ मे महाराष्ट्र दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
पुणे महानगरपालिकेचे वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन संपन्न.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिन निमित्त बुधवार दि. १ मे २०२४ रोजी मा. डॉ. राजेंद्र भोसले, प्रशासक तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ७ वाजता मा प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणण्यात आले.
या नंतर मतदानाचा टक्का वाढविणेकरिता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांचे समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली.
या प्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) पृथ्वीराज बी.पी. तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments