दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, मधील पोलीस ,हे हडपसर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना,
एका इसमाकडे असलेल्या दुचाकी वाहन संदर्भात पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यास थांबवून विचारपूस केली असता ती दुचाकी वाहन चोरीची असून आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून नऊ दुचाकी मिळून आल्याने त्याच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी व त्याचा एक साथीदार, हे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण चे कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केलेली होती. नमुद आरोपी कडून हडपसर, मुंढवा, खडक, लोणीकाळभोर, चिंचवड, सासवड, उरुळी कांचन या पोलीस स्टेशन कडील ९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत, आरोपी यश संतोष झेंडे याचेकडुन किंमत ४ लाख,२० हजार रुपये किमतीच्या एकुण ९ दुचाकी वाहने हस्तगत करून, ९ गुन्हे उघडकीस झाले आहे.
दि.०९/०४/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हडपसर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे त्यांनी इसम नामे यश संतोष झेंडे, वय १९ वर्षे, रा. तात्या झेंडे यांचे खोलीत भाड्याने, नारायण नगर, शिवशंभु शाळेजवळ, फुरसुंगी, पुणे याचे कब्जात मिळुन आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे संशय आल्याने त्यास सी.आर.पी.सी. कलम ४१ (१) (ड) प्रमाणे ताब्यात घेवुन, त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्याने व त्याचा एक साथीदार पाहिजे आरोपी असे दोघांनी मिळून पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण चे कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केलेली होती. नमुद आरोपी यश संतोष झेंडे याचेकडुन किंमत ४,२०,०००/- रु.च्या एकुण ९ दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत.
नमुद आरोपी कडून हडपसर, मुंढवा, खडक, लोणीकाळभोर, चिंचवड, सासवड, उरुळी कांचन या पोलीस स्टेशन कडील ९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे- २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, सहा. पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, ज्ञानदेव गिरमकर, सुदेश सपकाळ, शिरीष गोसावी, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.
0 Comments