गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक, हद्दीत गुन्हेगार चेकिंग आणि पेट्रोलिंग करित असताना, बातमी मिळाली एक रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार हा इंद्रप्रस्थ लॉन्स कडुन भापकर मळ्याकडील जाणारे रस्त्यावर येणार असुन त्याचेकडे चोरीचे दागिने आहेत सदरची माहिती पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६ चे श्री. उल्हास कदम यांना कळवुन बातमी मिळालेल्या जागेवर जाऊन आरोपीला अटक केली आहे, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले आहेत, सदर बाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याचे चौकशीमध्ये त्याने वानवडी व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत तीन ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे,एकुण तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयातील एकुण १ लाख ,५४हजार, रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,
आरोपी विरुद्ध यापुर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा इत्यादी पोलीस स्टेशन येथे घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
दि.२६/०३/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिट कडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार कुणाल ऊर्फ बाब्या ठाकुर हा इंद्रप्रस्थ लॉन्स कडुन भापकर मळ्याकडील जाणारे रस्त्यावर येणार असुन त्याचेकडे चोरीचे दागिने आहेत.
सदरची माहिती पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६ चे श्री. उल्हास कदम यांना कळवुन बातमीप्रमाणे जाऊन सदर ठिकाणाचे जवळ जाऊन आडबाजुस थांबुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता नमुद वर्णनाचा इसम हा संशयीत रित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास युनिटकडील पथकाने पकडले युनिटकडील पोलीस पथकाने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव कुणाल ऊर्फ बाब्या प्रल्हाद ठाकुर वय २३ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्याचेकडे सोन्याचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त केले असुन सदर बाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याचे चौकशीमध्ये त्याने वानवडी व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत तीन ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले.
एकुण तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयातील एकुण १,५४,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी विरुद्ध यापुर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा इत्यादी पोलीस स्टेशन येथे घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, शेखर काटे ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
0 Comments