सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतून सायकल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती, त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाला चोरीच्या सायकलचे शोध लावण्यासाठी सूचना दिल्या होत्या, सहकारनगर पोलिसांनी धनकवडी येथून एका आरोपीला अटक केली आहे,अधिक तपास करता जानेवारी २०२४ पासुन त्याने के.के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या ठिकाणाहुन आणखी ५ सायकल चोरी केलेचे कबुल करुन सायकली काढुन दिलेल्या आहेत. अशा एकुण ६ सायकल त्याकडुन हस्तगत केलेल्या असुन, पुढील तपास चालु आहे.
सहकारनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७९/२०२४ भादवि ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने पोस्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि सुरज गोरे व अंमलदार यांना सायकल चोरीचे अनुषंगाने तपास करुन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दुर करणेबाबत व सायकलचा तपास करनेबाबत मार्गदर्शनपर सुचना केलेल्या होत्या, सदर चोरीचे अनुषंगाने तपास पथक पोस्टे हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदारकडुन बातमी मिळाली कि, एक अंदाजे २०-२२ वर्षाचा इसम अंगात ग्रे कलरचे हुडी असलेले जरकिन व पांढरी जिन्स पॅन्ट घालुन संशयास्पदरित्या सायकल वर जवाहर बेकरी, धनकवडी याठिकाणी फिरत आहे,
सदर बातमीवरुन तपास पथकासह नमुद ठिकाणी रवाना होऊन त्यास हटकताच तो सायकलसह पळुन जावु लागल्याने त्यास थोड्याच अंतरावर ताब्यात घेवुन त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे वय २१ वर्षे रा. स्नेह घर खाशाबा जाधव स्कुल नं.४ शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड मागे शिवाजीनगर पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे अधिक विचारपुस करता ती सायकल त्याने चोरी केलेचे सांगितले सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९/२०२४ भादवि ३७९ हा दाखल असुन, अधिक तपास करता जानेवारी २०२४ पासुन त्याने के.के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या ठिकाणाहुन आणखी ५ सायकल चोरी केलेचे कबुल करुन सायकली काढुन दिलेल्या आहेत. अशा एकुण ६ सायकल त्याकडुन हस्तगत केलेल्या असुन, पुढील तपास चालु आहे.
सदर कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ -२ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा.पो.आयुक्त स्वारगेट विभाग श्रीमती नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशनचे श्री. सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक सुरज गोरे, सहा. फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, अमीत पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल वाघ, भाऊसाहेब आहेर यांनी केलेली आहे.
0 Comments