वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर. वानवडी परिसरामध्ये घरपोडी करणाऱ्या सराईत चोराला अटक, आरोपीकडून ३ गुन्हे उघड, चोरी केलेला एकून ६ लाख, ७९ हजार,२५०- सोन्याचा मुद्देमाल जप्त.


वानवडी पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिसांनी सदर जागेच्या आजूबाजूतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा शोध घेत असताना, सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये घरफोडी करणारा सराईत आरोपी दिसून आला वानवडी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस अटक करून त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल तपास केला असता त्याने वानवडी परिसरामध्ये एकूण ३ घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. आरोपीकडून चोरी केलेला एकून ६ लाख, ७९ हजार,२५०- सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, पुढील तपास वानवडी पोलीस स्टेशन करत आहे.

दि.११/०२/२०२३ फिर्यादी यांचे घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा कि.रु. २.३३,५५०/- रु.चा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६७/२०२४, भादंवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगसाठी दोन पथके तयार केली होती. तपासा दरम्यान सीसीटिव्ही मध्ये दिसणारा संशयीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, वय २१ वर्षे, रा. सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे हा असल्याचे माहिती मिळाल्याने तात्काळ सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पतंगे यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे चोरी करणा-या फहिम फैयाज शेख यास ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली.

अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे -

रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, चय २१ वर्षे, रा. सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे

वर नमूद अटक आरोपीत याचेकडे अधिक तपास करता त्याने वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत आणखीन दोन ठिकाणी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपीकडून
१) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १६७/२०२४, भा.दं. वि. कलम ४५४,३८० 

२) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २५/२०२४, भा.दं.वि. कलम ४५४,३८० 

३) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६०१/२०२३. भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० हे गुन्हे उघड करण्यात आलेले असून सदर गुन्हयातील चोरी केलेला एकूण ६,७९,२५०/- रु. किं.चा सोन्याचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक संतोष सोनावणे, वानवडी पोस्टे पुणे. हे करत आहेत

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि.-५, पुणे श्री आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. संजय पतंगे पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments