मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुब्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माणकरणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देणेबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. २०२४ या चालु वर्षातील मकोका अंतर्गत केलेली ही १५ वी कारवाई आहे.
फिर्यादी हया दिनांक ०७/०२/२०२४ रोजी चिंचवडगावकडे जाणा-या पीएमपीएमएल बसमध्ये उभ्या असताना साधारणत ५ वा सुमारास बस छत्रपती शिवाजी ब्रिजवर पुणे मनपा येथे आली असताना १) अमित नाना चव्हाण वय २७ वर्ष, हडपसर पुणे व नेहा बबन सोनवणे, वय २० वर्ष, रा. निगडी ओटास्किम निगडी पुणे यांनी संगनमताने फिर्यादी यांचे उजव्या हातातील एक सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने तोडुन हातातुन हिसकावुन घेऊन बांगडीसह पळून जात असताना बस मध्ये मिळुन आले फिर्यादी यांचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस ठाणेत गुन्हा रजिस्टर नंबर ४१/२०२४ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अमित नाना चव्हाण वय २७ वर्ष, ससानेनगर हडपसर पुणे. (टोळी प्रमुख) व नेहा बबन सोनवणे, वय २० वर्ष, रा. निगडी ओटास्किम सेक्टर नं.२२ सजंय स्वीटजवळ, निगडी पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
नमुद गुन्हयातील अमित नाना चव्हाण यांने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन त्यानी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन, त्यांचे विरुध्द पुणे शहरामध्ये स्वतःचे अवैध आर्थिक फायदयाकरीता, चोरी करणे, जबरीचोरी करणे, दरोडा टाकणे, दुखापत करणे, हत्याराचा धाक दाखवुन लुटणे, विनापरवाना घातक हत्यार जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, व अन्य शरिराविरुध्दचे गुन्ह्याची नोंद आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१)(ii) ३(२).३(४) चा अंतर्भाव करणे कामी शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चद्रशेखर सावंत यांनी पोलीस उप आयुक्त, परि १. पुणे शहर, श्री. सदिपसिंह गिल यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.नं.४१/२०२४,
भा.द.वि.कलम ३९२.३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे, श्री साईनाथ ठोंबरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. पोलिस सह आयुक्त श्री प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ १, पुणे शहर, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर, श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे, श्री चंद्रशेखर सावंत सहा पोलीस निरिक्षक कैलास डाबेराव, पोलीस उप निरीक्षक अजित बडे पोलीस अंमलदार संतोष मेमाणे, रोहित झांबरे, दिलीप नागरे, नलीनी क्षिरसागर, स्वालेहा शेख यांनी केली आहे.
0 Comments