सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर. पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत आरोपीला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, आरोपीकडून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त.

सिंहगड रोड पोलीस हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की पिंपरी चिंचवड येथील तडीपार इसम हा, जे एस पी एम कॉलेज सिंहगड रोड येथे थांबला आहे, वरिष्ठांना माहिती देऊन, सदर इसमाला पळून जाण्याच्या तयारी त असताना त्याला पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे असे मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे, 
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संतोष भाडंवलकर हे करीत आहे नमुद अटक आरोपी याचे विरुध्द वेगवगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.


दि.२०/०३/२०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड पोलीस स्टेशन याचे आदेशाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयीत इसम चेक करीत असताना पोलीस अंमलदार यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम जे.एस.पी.एम कॉलेजच्या समोरील रोड लगत नन्हे पुणे येथे थांबलेला आहे व त्याचे जवळ एक गावठी पिस्टल असुन त्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल येथुन तडीपार केले आहे अशी बातमी मिळाली.

सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला. सदर इसम त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग करुन काही अंतरावर त्याला पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आदेश ऊर्फ ऋषिकेश राम टेमकर वय २१ वर्षे रा. सुसगाव मुळशी पुणे असे सांगितले. त्याच्या बाबत अधिक चौकशी करता तो हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथील रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्यास पुणे जिल्ह्यातुन एक वर्षा करीता तडीपार करण्यात आले असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे पॅन्टच्या आत मध्ये खोसलेले एक ५०,०००/-रुपये किं. चे गावठी पिस्टल व पॅन्टचे खिश्यात १,०००/-रु.किं. चे दोन जिवंत काडतुसे असा एकुण ५१,०००/-रु. किं.चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन त्यास दि.२१/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संतोष भाडंवलकर हे करीत आहे नमुद अटक आरोपी याचे विरुध्द वेगवगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग (अतिरिक्त पदभार) सिंहगड रोड विभाग, पुणे श्री. भिमराव टिळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली.

Post a Comment

0 Comments