पुणे, चंदननगर पोलिसांची कामगिरी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीस पाठलाग करून केले जेरबंद


यातील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरून चंदननगर पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नं.४९३/२०२३, भादवि कलम ३०७,४९८, (अ), ३२३,५०४, ५०६, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), व मपोकाक ३७ (३) (१), सह १३५ तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४ तसेच क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने यातील पाहिजे आरोपी संजय कारभारी शिंदे, रा. वडगावशेरी पुणे हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी संजय याचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार अविनाश संकपाळ, गणेश हांडगर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संजय कारभारी शिंदे हा अण्णापुर शिरूर पुणे या ठिकाणी एका शेता मध्ये लपुन बसला आहे अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील टिम सदर ठिकाणी रवाना होवुन बातमी मिळालेल्या ठिकाणी आड बाजुस थांबुन पाहणी केली असता आरोपी हा एका उसाच्या शेतातुन बाहेर येताच त्याला सदर ठिकाणी पोलीस स्टाफ आल्याची चाहुल लागल्याने त्याने तेथुन पळ काढला तेव्हा पोलीस स्टाफने त्याचा पाठलाग करून काही अंतरावर पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव- संजय कारभारी शिद, वय ३२ वर्षे, रा. घर नं.५, सागर पार्क, टाटागार्डन चौकाचे जवळ, वडगावशेरी पुणे यास पुढील कार्यवाही करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन अटक केली आहे. पुढील तपास प्रशांत माने, सहा पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पो. आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री.संजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, श्रीमती मनीषा पाटील, तपास पथक प्रभारी अधिकारी पो.उप. निरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, ज्ञानोबा लहाणे, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments