मुंढवा पोलिसांची सतर्कता आणि सोशल मीडियाचा योग्य वापर, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ग्रुप तयार केलेले होते याच अनुषंगाने मुंढवा पोलिसांकडे एक चौदा वर्षाची मुलगी हरवल्याची तक्रार आली होती ग्रुपच्या माध्यमातून, मुंढवा पोलिसांच्या सर्व पोलिसांना कळविण्यात आले, त्याच दरम्यान पोलिसांना फोन आला एक मुलगी सिद्धी बिल्डिंग पार्किंग येथे मिळून आली आहे, पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मुलीला घेऊन मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये आणून मुलीची आणि आईची भेट करून दिली. मुलीची सुकृप्त भेट करून दिल्याबद्दल, मुंढवा पोलिसांचे आभार मानले.
मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ठाणे स्तरावर चौकी तक्रार, डायल ११२, कंट्रोलरुम पोलीस मदत कॉलची वेळेत पुर्तता होणे, वेळेत पोलीस मदत मिळणे करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलीस ठाणे कडील अधिकारी अंमलदार यांचे व्हॉटस्अप ग्रुप तयार केले आहेत. सदर ग्रुपवर सर्व कॉलची तसेच तक्रारींची माहिती शेअर करुन विहीत वेळेत तक्रारींची पुर्तता करण्यात येते.
दिनांक ०१/०३/२०२४ रोजी केशवनगर बिट मार्शल यांना कॉलर नामे सरिता, रा. एसएनबीपी स्कुल, मांजरी, पुणे यांनी एक चौदा वर्षाची मुलगी ही सिद्धी बिल्डींग पाकींगमध्ये मिळुन आली असल्याचा कॉल प्राप्त झाला सदरचा कॉलचे पुर्ततेकामी बिट मार्शल रवाना झाली. तसेच सदर कॉलचा फोटो पोलीस ठाणे कडील ग्रुपवर शेअर केला, सदर वेळी मुंढवा पोलीस ठाणे येथे एक महिला रेखा मुकेश वर्मा, रा. गायकवाड फार्म, गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, पुणे ह्या देखील त्यांची मुलगी काजल मुकेश वर्मा वय १४ वर्षे हरवलेली असल्याची तक्रार देणेकरीता आल्या होत्या, तेव्हा पोलीस उपनिरीक्षक, शुभांगी मगदुम यांनी त्यांचेकडे विचारपुस करुन मुलीचा फोटो घेवून केशवनगर बिट मार्शला पाठवून खात्री करणे बाबत सांगितले. प्राप्त झालेल्या कॉलमधील मुलगी व पोलीस ठाणेस तक्रार देणे करीता आलेल्या तक्रारदार यांची मुलगी ही एकच असल्याची खात्री झाली. सदरची माहिती ही तक्रारदार रेखा मुकेश वर्मा यांना दिली असता डोळ्यातून आनंद अश्रू आले. सदर मुलीस पोलीस ठाणेस घेवून आल्यानंतर मुलीची व आईची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकींना मिठी मारली. सदर मुलीस त्यांचे आईचे सुखरुप ताब्यात दिले असता त्यांनी पोलीसांनी केलेल्या सहाकार्य व मदतीस भारावून निशब्द होवून आनंद अश्रूद्वारे कौतूक केले.
सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा.पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी,पोलीस उपनिरीक्षक, शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार सचिन अडसुळ, प्रविण कोकणे, स्नेहल शिंदे यांनी केली आहे.
0 Comments