वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन चे तपास पथक हे घरफोडीतील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की येरवडा येथे चोरी करणारे आरोपी हे नगर रोडवर येणार आहेत, पोलिसांनी सदर बातमी वरिष्ठांना कळवून बातमीच्या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले आहे, सदर गुन्ह्यांमध्ये येरवडा पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून १ लाख ५९ हजार ९३२/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे, पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.
दि.०४/०३/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोलिस अमंलदार अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज येरवडा येथे चोरी करणारे संशयीत आरोपी हे वाडिया बंगला नगर पुणे रोड व ब्रम्हासनसिटी वडगाव शेरी येथे उभे असल्याची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले
त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल व स्टॉप यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना पकडले. त्यांना ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता १. तौसिफ बशीर शेख वय २५ वर्षे रा कोंढवा पुणे २. अमोल किसन अवचरे वय २८ वर्षे रा कासेवाडी भवानी पेठ पुणे ३. आजिम सलिम शेख वय २४ वर्षे रा कासेवाडी भवानीपेठ पुणे ४. प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे वय २४ वर्षे रा कासेवाडी भवानी पेठ पुणे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी येरवडा परिसरात चोरी केल्याने येरवडा पो.स्टे.गु.र.नं. २७/२०२४ भादवि कलम ४५७,३८० व गु.र.नं.१०४/२०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८० हे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपींना अटक करुन पोलीस कस्टडी मध्ये तपासा दरम्यान त्यांनी स्वारगेट, कोंढवा परिसरात चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन संबंधित पोलीस स्टेशन अभिलेखावरील दुकानाचे शटर उचकटून केलेले खालील गुन्हे केल्याचे कबूल केल्याने उघडकीस आलेले आहेत.
सदर आरोपींकडून खालील एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले असून एकूण ७८,९००/- रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने त्यामध्ये ४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे ३० कॉईन व सोन्याचे ३ कॉईन व ४१,५००/- रोख रक्कम, ९५३२/-रु. किंमतीचे किराणा सामान, ३०,०००/-रु. किंमतीची मोटार सायकल असा एकूण १,५९,९३२/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१. येरवडा पोलीस स्टेशन गु र नं २७/२०२४ भादवि ४५७,३८०
२. येरवडा पोलीस स्टेशन गु र नं १०४/२०२४ भादवि ४५४,४५७,३८०
३. कोंढवा पोलीस स्टेशन गु र नं २३४/२०२४ भादवि ४५७,३८०
४. स्वारगेट पोलीस स्टेशन गु र नं ८९/२०२४ भादवि ४५७,३८०
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ ४, श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. संजय पाटील, वरिष्ठ पो.निरी.येरवडा पो.स्टे. श्री. संतोष पाटील, पो. निरी. गुन्हे, येरवडा पो.स्टे. श्रीमती आशालता खापरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पो.उप. निरी. स्वप्निल पाटील, श्रेणी पो.उप.निरी. प्रदिप सुर्वे, पोलिस अमंलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.
0 Comments