आरोपीकडून संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी खुन, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी चोरी करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देणेबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. २०२४ या चालु वर्षातील मकोका अंतर्गत केलेली ही १७ वी कारवाई आहे.
दिनांक २३/०२/२०२४ रोजी रात्री. १२ वाजता चे सुमारास फिर्यादी हे घराजवळील रामनगर येथील अचानक चौकातील पार्किंगमध्ये त्यांचा मित्र सुरज गायकवाड याचेसोबत गप्पा मारत असताना विकी काळे, व त्याचे साथीदार हे तेथे येवून तु अरबाज शेख व निल नाईक याची मांडणे का सोडवली त्याचे कारणांवरून राग मनात धरून त्यांनी फिर्यादी वर जीवघेणा हल्ला केला. तसेच मित्र सुरज गायकवाड याचे उजव्या हाताच्या करंगळीचे शेजारील बोटावर मारून जखमी केले तसेच नितीन बुरडे यालासुध्दा मारहाण करून जखमी केले व फिर्यादी यांचे बाथरुमचा दरवाजा तोडून फोडून नुकसान करून जमलेल्या लोकांवर हातातील कोयता, बांबू, रॉड उगारून गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केली म्हणून त्यांचेविरुध्द फिर्यादी यांनी वारजे माळवाडी पो.स्टे. गु.र.नं.८०/२०२४ भा.दं.वि. ३०७,३२४.३२३. ५०६,१४३,१४४,१४७,१४८, १४९,४२७ आर्म अॅक्ट ४ (२५), मपोअ क ३७ (१) (३) सह १३५ क्रि.लॉ.अ ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान १) हेमंत उर्फ विकी धर्मा काळे वय २६ वर्षे रा. रामनगर, वारजे, पुणे (टोळी प्रमूख) २) धनंजय नागनाथ सुर्यवंशी वय २८ वर्षे रा. गणेशपुरी सोसा. तळमजला वारजे, पुणे ३) अक्षय ऊर्फ अवदुत महेश यादव वय २९ रा. अचानक चौक, रामनगर, वारजे, पुणे ४) कुंदन ऊर्फ सोन्या शिवाजी गायकवाड वय २५ रा. अचानक चौक, रामनगर, वारजे, पुणे ५) युवराज धर्मा काळे वय २४ रा. अचानक चौक, रामनगर, वारजे, पुणे ६) संजय ऊर्फ बाबू विकास चव्हाण वय २० वर्षे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून एक पाहिजे आरोपी व ३ अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
नमुद गुन्हयातील हेमंत उर्फ विकी धर्मा काळे (टोळी प्रमूख) यांने आपले अधिपत्याखाली प्रत्येक
गुन्ह्यात सामाईक साथीदार व नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची
संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी खुन, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी चोरी करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२).३(४) चा अंतर्भाव करणे कामी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज शेडगे, यांनी पोलीस उप आयुक्त, परि ०३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम यांचे मार्फतीने मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री.प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन वारजे माळवाडी पो.स्टे. गु.र.नं. ८०/२०२४ भा.दं.वि. ३०७,३२४, ३२३,५०६,१४३,१४४,१४७,१४८.१४९,४२७ आर्म अॅक्ट ४ (२५), मपोअ क ३७ (१) (३) सह १३५ कि. लॉ.अ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii) ३(२).३(४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे, श्री. मिमराव टेले हे करीत आहे ,
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविण पवार, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि ३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, श्री. भिमराव टेके, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज शेडगे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे, तसेच पोलीस अमंलदार अतुल भिंगारदिवे, रामदास गोणते, गोविंद फड, किरण तळेकर, विजय खिलारी व नितीन कातुर्डे यांनी केलेली आहे.
0 Comments