चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर. चोरीचे मोबाईल फोन विक्री करीता घेवुनआलेल्या आरोपींना अटक. आरोपी परराज्यातुन येवुन मोबाईल चोरी करायचे,

चंदन नगर पोलिसांना बातमी मिळाली की
एक महिला व एक पुरुष शिवाजी महाराज पुतळा, भाजी मंडई, चंदननगर पुणे येथे चोरीचे मोबाईल फोन विक्री करीता घेवुन आले आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीचे ८ मोबाईल मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे, आरोपींकडून ५४ हजार /- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी वरून चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंगर १०१/२०२४, भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास चंदनननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करत असताना दि.२७/०२/२०२४ पोलीस अंमलदार विकास कदम, नामदेव गडदरे, यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, एक महिला व एक पुरुष शिवाजी महाराज पुतळा, भाजी मंडई, चंदननगर पुणे येथे चोरीचे मोबाईल फोन विक्री करीता घेवुन आले आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर बातमी बाबत माहीती वरीष्ठांना कळवुन वरीष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

तपास पथक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजी मार्केट या ठिकाणी रवाना होवुन तेथे बातमीतील वर्णनाप्रमाणे एक महिला व एक इसम उभे असल्याने दिसल्याने त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे- १) किरण अमरसिंग नटमारवाडी, वय १९, रा. स्वराज नगरी, परिसरातील मोकळया जागेतील झोपडयामध्ये तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मुळ पत्ता-नडीयाद, जवाहरनगर, सिंधी शाळेमागे, खेडा गुजरात, २) महिला नामे मांगि अमरसिंग नटमारवाडी, वय ४७ रा. स्वराज नगरी, परिसरातील मोकळया जागेतील झोपडयामध्ये तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मुळ पत्ता-नडीयाद, जवाहरनगर, सिंधी शाळेमागे, खेडा गुजरात असे असल्याचे सांगितल्याने त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे मिळुल आलेल्या ३ मोबाईल बाबत विचारपुस केली असता व त्यांना पुढील चौकशी कामी चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे ८ मोबाईल काढुन दिले असुन एकुण ५४ हजार /- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा - विभाग- श्री. संजय पाटील चंदननगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. मनीषा पाटील, मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी पो.उप. निरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, विकास कदम, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, शेखर शिंदे, विष्णु गोने, श्रीकांत कोद्रे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, सुरज जाधव, गणेश हांडगर, ज्ञानोबा लहाणे, नितीन कांबळे, गजानन पवार, महिला पोलिस अंमलदार वर्षा सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments