स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरी व जबरदस्तीने मोबाईल हेच काम येणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिलीप फुलपगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिसांनी सदर ठिकाणाची सी,सी,टी,व्ही तपासणी केली, सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपींना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, आरोपींकडुन दाखल गुन्ह्यांमधील एकुण २ लाख १० हजार रुपये किंमतीची ४ दुचाकी वाहने व एक मोबाईल फोन जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथील ४ गुन्हे उघड केले आहेत.
स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या तसेच लोकांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेवुन जाण्याच्या घटना घडत होत्या त्यावरुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते,दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत वरिष्ठांनी तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशित केले होते.
त्यावरून तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दिपक खंदाड, संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेख व फिरोज शेख यांनी सदर परीसरातील सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलींग करीत असताना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे राजेन्द्र परमेश्वर कदम वय २४ वर्षे धंदा वाळु सीमेंट सप्लायर्स रा.पुणे यास अटक करुन त्याचेकडुन तपासादरम्यान २ दुचाकी तर एका विधीसंघर्षीत बालकांकडुन १ दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
तसेच दुचाकी वरुन भरधाव वेगाने येवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकावुन घेवुन जाणाऱ्या आरोपी नामे १) साद शेरअली शेख वय २२ वर्षे रा. ९३२, सदानंदनगर सोमवार पेठ पुणे २) उदय सुनिल जाधव वय २२ वर्षे रा. ९३२, सदानंदनगर सोमवार पेठ पुणे यांना अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात त्यांनी चोरी केलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
नमुद आरोपींकडुन दाखल गुन्ह्यांमधील एकुण २ लाख १० हजार रुपये किंमतीची ४ दुचाकी वाहने व एक मोबाईल फोन जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथील ४ गुन्हे उघड केले आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा.श्रीमती नंदिनी वग्यानी साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दिपक खंदाड,अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, संदीप घुले, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.
0 Comments