कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. लष्करात नोकरीला लावतो, सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोंढवा पोलीस व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त कारवाई करुन घेतले ताब्यात.


आरोपी विनायक तुकाराम कडाळे यांनी कंमान्ड हॉस्पीटल व लष्करात विविध पदावर नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी व यांचे परिचयाचे लोकांना व नातेवाईकांना कडुन १३ लाख ५० हजार रुपये रक्कम घेवुन त्याची फसवणुक केली होती. यासंदर्भात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अनेक लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी सोबत आणखी कोण कोण आहे याचा तपास कोंडवा पोलीस करत आहे.


कोंढवा भागाच्या लगत लष्कराचे कंमाड हॉस्पिटल येथुन अकाऊंन्ट (सिव्हिल सर्व्हिस ) यापदावरुन स्वेईच्छा सेवानिवृत्त घेतलेले विनायक तुकाराम कडाळे यांनी कंमान्ड हॉस्पीटल व लष्करात विविध पदावर नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी व यांचे परिचयाचे लोकांना व नातेवाईकांना कडुन १३ लाख ५० हजार रुपये रक्कम घेवुन त्याची फसवणुक केली होती. त्याबाबत विनायक तुकाराम कडाळे यांच्या विरुध्द कोंढवा पो. ठाणे येथे गुरन.८४/२०२४ भादवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा केल्यानंतर सदर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुसन्या ठिकाणी राहण्यास गेला होता. त्याच्याबाबत माहिती साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजंन्ट व कोंढवा तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक, लेखाजी शिंदे व विकास बाबर व तपास पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना दि.०३/०३/२०२४रोजी तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अमलदार विकास मरगळे, रोहित पाटील व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजेन्ट यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा लुल्लानगर चौकातील सपना पावभाजी सेंटर जवळील हिल व्हुव सोसायटीमध्ये राहत असुन तो घरातुन बाहेर जाताना स्वताःचे अस्तित्व लपवुन वावरत असतो. सदर माहितीच्या अनुषंगाने दि.०३/०३/२०२४ रोजी हिल व्हुव सोसायटीचे बाहेर लष्कर पथक व कोंढवा पोलिस ठाणे तपास पथक सोसायटीच्या आजुबाजुला वेशांतर करुन सापळा रचुन थांबले असता सदर इसम हा त्याचे राहते घरात नसलेबाबत माहिती मिळाल्याने बराच कालावधी पर्यंत तो घरी येईपर्यंत सापळा कारवाई चालु ठेवली नमुद इसम हा तोंडाला कापड बांधुन जात असताना दिसला सदर इसमाचा त्याचे प्लॅट पर्यंत पाठलाग करुन त्यास त्याचे रहाते घरातुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक विकास बाबर हे करित आहे.

सदरील कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.५ पुणे श्री. आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. गणेश इंगळे, कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलिस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे, शशांक खाडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments