आरोपीकडून १ लाख, ४० हजार,/- रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत, नमुद आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. फिर्यादी यांचे लॅपटॉप दुरुस्तीचे दुकान आहे, फिर्यादी काही कारणाने दुबईला गेले असताना या संधीचा फायदा उचलून हार्डवेअर इंजिनियर इंजिनिअर समीर रामनाथ थोरात यांनी ४ लॅपटॉप आणि इतर साहित्य हे घेऊन पसार झाले होते, या संदर्भातील गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सायबर पथक यांनी सखोल तपास करून आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी यांनी त्यांचे संगणक विक्री व दुरुस्तीचे दुकानात हार्डवेअर इंजिनिअर समीर रामनाथ थोरात वय ३९ वर्षे यास सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान नोकरीस ठेवले होते. फिर्यादी हे दुबई येथे गेलेले असल्याचा गैरफायदा घेवुन दुकानातील ४ लॅपटॉप व इतर साहीत्य तसेच ग्राहकांकडून कॉम्प्युटरचे साहीत्य असे परस्पर घेवून पसार झाल्याने, फिर्यादी यांनी त्याचे विरोधात तक्रार दिल्याने फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४५/२०२४ भादवि ४२०,४०८ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.
मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ श्री. संदिपसिंह गिल्ल, यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकास दिल्या होत्या त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार सहा. पो. निरी. बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी नमुद आरोपीचा अहमदनगर व छ. संभाजीनगर येथे कुशलतेने शोध घेऊन यशस्वी सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी करुन, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दिनांक ०८/०३/२०२४ रोजी वरील गुन्हयात अटक करुन, त्याच्या कडुन गुन्ह्यातील १,४०,०००/- रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत. नमुद आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पो.स्टे. श्री. चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वा खाली सहा. पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी,रुचिका जमदाडे यांनी केली.
0 Comments