झिरो टोलरंन्स टु ड्रग या मोहिमेअंर्तगत मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी ड्रग फ्रि पुणे हे अभियान राबवुन पुणे शहरातील अमली पदार्थाचे रामुळ उच्चाटण करणे बाबत आदेश निर्गमित केले होते. त्या अनुशंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अभिलेखावरील अंमली पदार्थ गुन्हयातील आरोपीचे चेकींग मोहीम राबविणे चालु आहे.
वरील मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आज रोजी मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे व पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली १५ पथके नेमुन ती दि.२०/०३/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील फुरसुंगी, येवलेवाडी, उड़ी पिसोळी, मांजरी, वानवडी, कोढ़या या हदिमध्ये रवाना करण्यात आली होती. सदर टिमने रेकॉर्डवरील आरोपी तसेच पेडलर यांना चेक केले. सदर ऑपरेशन दरम्यान एकुण ५ आरोपी यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घरामध्ये अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नागे १) आयडोफो फेबिन येनेडयु, रा.पिसोळी, पुणे याचेकडे २४ ग्रॅम एम.डी. २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, रा. येवलेवाडी, कोंढवा, पुणे याचेकडे ३० ग्रॅम एम.डी. ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, रा. मांजरी, पुणे यांचेकडे ३४ ग्रॅम एम.डी. ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु रा. बांदलवस्ती, लेन नं.१. उंड्री वडाची वाडी रोड, पुणे यांचेकडे २६ ग्रॅम एम. डी. असा एकुण ११४ ग्रॅम अंमली पदार्थ (एम. डी.) किंमत रुपये २२,००,०००/- चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपीकडून तीन दुचाकी वाहने कि.१,००,०००/- असा एकुण २३,००,०००/- लाख रुपयेचा मुद्द्माल जप्त करण्यात आला आहे तसेच वरील आरोपी यांचे घर झडती दरम्यान अनधिकत वास्तव्यास असणारे ११ परदेशी नागरीक यांचेवर योग्य ती पुढील कारवाई करणेत येत आहे.
वरील नमुद आरोपी यांचेपैकी आरोपी नामे १) आयडीफो फेबिन येनेडयु, २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, हे तीन आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून, त्यांचेवर पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु हे ड्रग पेडलरचे काम करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी हडपसर पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये एकुण ४ गुन्हे दाखल केलेले आहेत.
तसेच आज दिनांक २०/०३/२०२४ रोजी कोथरुड पोलीस स्टेशन यांनी पेट्रोलिंग करीत असताना, गुणश्री सोसायटी जवळील रिकामे मैदान, किनारा चौक, कोथरूड, पुणे येथे ०२ इसम नामे १) ईर्शाद समशेर खान वय ३१ वर्ष चंदा. मजुरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे (२) ईक्बाल समशेर खान वय ३७ वर्ष धंदा खाजगी नोकरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे यांना ताब्यात घेवून, त्यांच्याकडुन ५७ ग्रॅम इतक्या वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत १२,०००००/- रुपये चा अंमली पदार्थ मिळून आला. त्या अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे येथे वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आज रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तलायाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ किंमत रुपये ३५ लाख /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. सुनिल तांबे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस स्टेशनचे श्री. संदीप देशमाने गुन्हे शाखेकडील ७ पोलीस निरीक्षक १५ सहा, पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक अधिकारी १२५ अंमलदार व कोथरुड पो स्टे कडील पो. स्टाफ यांनी केलेली आहे.
0 Comments