यातील फिर्यादी वय ४१ वर्षे रा. शिवाजीनगर पुणे , निरंकार अपार्टमेंट दुसरा मजला, ऑफिस क्र.४ एफसी रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथील ऑफिस बंद करून गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने कश्याच्या तरी सहाय्याने त्यांचे वर नमुद पत्यावरील तिनही ऑफिसचे दरवाज्यांचे कोयंडे तोडून त्याद्वारे आत प्रवेश करून त्यांच्या ऑफिसमधील एकूण ३४,०००/- रु. किंमतीचे चार लॅपटॉप व रोख रक्कम ४,०००/- रुपये असा एकूण ३८,०००/- रु किंमतीचा माल व रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेला म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा रजि. नंबर १६३/२०२१, भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. सचिन तरडे, यांनी करून तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्हीच्या आधारे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे मंगेश विजय चव्हाण, वय ३६ वर्षे, राहणार रास्ता पेठ, पुणे यास दाखल गुन्ह्यात निष्पन्न करून त्याचे विरुध्द भरपूर व सबळ पुरावा प्राप्त करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. दि.०३/०२/२०२४ रोजी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.एस. आर. तोतला यांचे न्यायालयात आरोपीतांविरुध्द गुन्हा शाबीत झाला व त्यात आरोपीत मंगेश विजय चव्हाण यास ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये ४०००/- दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
सदर कामी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रियंका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोर्ट पैरवी पोलिस अंमलदार सहा. पो. फौ. मोहन भापकर, कोर्ट अंमलदार पोहवा. ५७२० सोनवणे, मपोशि. ९३११ बेंद्रे यांनी केसचे कामकाज पाहीले.
0 Comments