सहकारनगर पोलीस ठाणे, पुणे शहर.नामांकीत कंपनीची डिलीव्हरी करणाऱ्या पिता-पुत्रास मारहाण करुन लुटणा-या गुन्हेगारांना ४८ तासात पोलीसांनी केले अटक.



फिर्यादी हे त्यांचे वडीलांसह एका नामांकीत कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणुन नोकरी करतात. दिनांक ०९/०२/२०२४ रोजी रात्रौ ते वडीलांसह नवनाथनगर धनकवडी, पुणे येथे बर्गरची डिलीव्हरी करण्यासाठी जात असताना, त्यांना तीन इसमांनी तंबाखु मागण्याचा बहाणा करुन फिर्यादी यांना लाईटचे टयुबचे नळीने मारुन जखमी करुन त्यांचा मोबाईल जबरी चोरी करून नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४४/२०२४ भादवी. कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक, सी. बी. बेरड, तपास पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक, बापु खुटवड व तपास पथकाकडील इतर स्टाफ तपास करीत असताना, पोलीस अंमलदार, महेश मंडलीक व सागर कुंभार यांना बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी नामे १) शंतनु मारूती लोहार, वय १८ वर्षे, रा.  धनकवडी, पुणे २) मंगेश ऊर्फ मंग्या हनुमंत चौरे, वय-२१ वर्षे, रा. नवनाथनगर, धनकवडी, पुणे ३) अविष्कार ऊर्फ अव्या अशोक दिघे, वय-२२ वर्षे, रा.गुलाबनगर, धनकवडी, पुणे यांनी केला असुन ते कात्रजकडुन नवले पुलाकडे जाणारे हायवे रोडवरील दत्तनगर जवळील सर्व्हस रोडवर असलेल्या जयभवानी हॉटेल समोर एक विना नंबर प्लेटचे गाडीसह थांबले असुन ते कोठेतरी पळुन जाण्याचे तयारीत आहेत. लागलीच तपास पथकाकडील स्टाफने नमुद आरोपींना जयभवानी हॉटेल दत्तनगर येथुन ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तपास करता, त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन, त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली १,१०,०००/- रुपये किमतीची दुचाकी गाडी व ७,०००/-रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण १,१७,०००/-रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक, महेश नलावडे करीत आहेत. सदरचा गुन्हा हा घडल्यापासुन ४८ तासाचे आत उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे, श्री. प्रवीणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ- २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्रीमती. नंदीनी वग्यानी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, सी.बी. बेरड तपास पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक, बापु खुटवड, पोलीस अंमलदार, बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, पोलीस अंमलदार महेश मंडलीक नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments