मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी वाहनचोरीस प्रतिबंध करणेबाबत व वाहनचोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेबाबतच्या सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांचे अनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ व मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे मार्गदर्शप्रमाणे तपास पथका मार्फत पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहनचोरीस प्रतिबंध व्हावा, याकरीता उपाययोजना चालू होत्या.
वाहनचोरीस प्रतिबंध होणेकामी करण्यात येणा-या उपाययोजनांचे अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पेट्रोलिंग नेमण्यात आली होती. त्यामध्ये ट्रॅप लावणे, सीसीटीव्ही फुटेज चेक करणे, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करणे वगैरे प्रकारे वाहनचोरीस प्रतिबंध करण्याची व गुन्हे उघडकीस आणण्याची कार्यवाही चालू होती.
सदर मोहीमे दरम्यान ज्या ठिकाणी वाहनचोरीचे गुन्हे घडलेले आहेत, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन इसम नामे निलेश रमेश कंधारे, वय ३३ वर्षे, रा. एम. आय. टी. रोड, कोथरुड, पुणे याला तपासपथकामार्फत सापळा लावुन, त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याच्या कडून एकुण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
नमुद आरोपीकडून अंदाजे रु. ६,००,०००/- रू.कि.च्या मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग श्री. भिमराव टेळे, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप देशमाने, सपोनिरी बालाजी सानप, पोलिस अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले,. संजय दहिभाते, आकाश वाल्मिकी, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके यांनी सदरची कामगिरी केली आहे.
0 Comments