दि. २१/०२/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु र नं १६३/२०२२ भादवि कलम ३०२,२०१,३४ मधील पाहिजे आरोपी नामे अनिकेत उर्फ उ-या आकाश उरणकर हा बर्निग घाट कोरेगाव पार्क पुणे येथे थांबलेला आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे पोलीस अंमलतार श्रीनाथ कांबळे व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे एक इसम थांबलेला दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता अनिकेत उर्फ उ-या आकाश उरणकर वय २५ वर्षे रा. गंगाधाम चौक मार्केटयार्ड पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याचे कडे चौकशी करता त्याने गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यास पुढील कार्यवाहीसाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ (अतिरिक्त कार्यभार) श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री संजय पाटील येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संतोष पाटील, पोलिस, निरीक्षक (गुन्हे), श्रीमती आशालता खापरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केलेली आहे.
0 Comments