पुणे शहरात रात्रीच्यावेळी बोपदेव घाटात होणाया जबरी चोयांच्या अनुषगांने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरींच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस उप-आयुक्त परि- ५, आर. राजा यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेच्या पुर्ततेकामी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांनी बोपदेव घाटात साध्या वेशात सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार पो.हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो. हवा ७९ निलेश देसाई, पो.हवा ११६१ सतिश चव्हाण, पो.हवा १४२२ लवेश शिंदे, पो. शि.४७९ शाहीद शेख, पो. शि.८५९१ लक्ष्मण होळकर, पो.शि.९८३८ संतोष बनसुडे, असे कोंढवा पोलीस स्टेशन अभिलेखावरील दाखल झालेल्या जबरी चोया गुन्ह्यांचा तपास करीत असताना त्यांनी बोपदेव घाट परीसरात सापळा रचुन स्टाफच्या मदतीने बोपदेव घाटमाथ्यावर साध्या वेषात रोडच्या बाजुला थांबुन संशयीत वाहने व इसमांचा शोध घेत होते. तेवढयात दोन दुचाकी वाहनांवर तीन इसम सासवड कडुन पुण्याच्या दिशेने येत असल्याचे दिसुन आले. त्यातील एका दुचाकीस पुढील व मागील बाजुस नंबर प्लेट नव्हती. ते घाटमाथ्यावर फिरत असणाया लोकांकडे पहात आपआपसात बोलत होते त्यामुळे त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडे जावुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन इसमांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांचेकडे एक दुचाकी पल्सर आणि एक चाकु मिळुन आला त्यांच्यासोबतचा दुसऱ्या दुचाकीवरील एक इसम हा अंधाराचा फायदा घेवुन तेथुन पळुन गेला. भेटलेल्या दोन इसमांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १. नागेश संजय चव्हाण रा. मोमीन आखाडा राहुरी जि अहमदनगर २. चेतन सिताराम खैरे रा. गाव नाझरे कडे पठार, खैरेवाडी ता पुरंदर असे असल्याचे सांगीतले. सदर आरोपी यांच्याकडे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील व पुणे शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषगांने सखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यांच्याजवळील नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी पल्सर गाडी ही काही दिवसापुर्वी बोपदेव घाटातुन तीन तरूणांना चाकुचा धाक दाखवुन सदरची दुचाकी चोरी करुन नेल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचेकडे तपास करता त्यांनी सदरची दुचाकी ही चोरुन नेली असल्याबाबत कबुली दिल्याने
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस पुढील तपास करीत आहे.
१) कोंढवा पोलीस ठाणे कडील गुरन. ४३/२०२४, भा.दं. वि. कलम. ३९२,३४.
वरिल नमुद कारवाई मा. रितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, मा. रंजनकुमार शर्मा, साो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा. शाहुराव साळवे सो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री संदीप भोसले, मा. पोलीस निरीक्षक सो., गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार/६९५१ विशाल मेमाणे, पोलीस हवालदार/७९ निलेश देसाई, पोलीस हवालदार/११६१ सतिश चव्हाण, पोलीस हवालदार/१४२२ लवेश शिंदे, पोलीस अंमलदार/४७९ शाहीद शेख, पोलीस अंमलदार/८५९१ लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार/९८३८ संतोष बनसुडे, यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments