भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.मोका गुन्हयामध्ये ८ महीन्यापासुन फरार असलेल्या २ आरोपींना अटक.


आरोपी हे त्याचे अस्तीत्व लपवुन वारंवार वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये त्याची ओळख व ठाव ठिकाणा बदलुन वास्तव करीत होते.
भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळाली की सदर आरोपी हे कोंढवा तालाब चौक या परिसरामध्ये आहेत, भारती विद्यापीठ पोलिसांनी कोंढवा तालाब चौक येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७, ३८५, ३८७, ३२४, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६(२), सह क्रि. लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४(२५), म पो अधि ३७ (१) सह १३५, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधि. २०१५ कलम ८३ (२)

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२) ३ (४) या गुन्हयातील पाहीजे आरोपी १. जावेद बद्रेआलम शेख, वय २१ वर्षे, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव बु, पुणे २. सुरज नंदु बांदल, वय १९ वर्षे, रा. सध्या शनिनगर, विठ्ठल मंदीराजवळ, दत्तनगर, आंबेगाव बु, पुणे हे गुन्हा दाखल झाल्यापासुन मिळुन येत नव्हते.

नमुद आरोपी हे त्याचे अस्तीत्व लपवुन वारंवार वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये त्याची ओळख व ठाव ठिकाणा बदलुन वास्तव करीत होते. त्यांना पकडण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारांचे बातमीवरुन पोलीस अंमलदार चेतन गोरे व सतिश मोरे यांना नमुद आरोपीतांचे तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपीबाबत माहीती घेत असताना नमुद आरोपी हे कोंढवा, तालाब चौक, पुणे येथे असल्याचे खात्रीदायक माहीती प्राप्त झाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोंढवा, तालाब चौक, पुणे या भागात जावुन सदर आरोपीतांचा कसोशीने शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन सदर आरोपीतांना नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.

सदरची कामगिरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, सतिश मोरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments